ताज्या बातम्या

तुमच्याकडे ‘ई-बाईक’ आहे का? मग ही बातमी महत्वाची

Electric bikes :विद्युत बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांमध्ये (ई-बाईक्स) आग लागण्याचे प्रकार वाढल्यानंतर प्रशासनाने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. वाहनांमध्ये अनधिकृत फेरफार केल्याने या घटना घडत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला असून यासंबंधी सर्व ई- ई-बाईक्सची तपासणी मोहीम आरटीओतर्फे हाती घेण्यात आली आहे.

मान्यताप्राप्त संस्थेची परवानगी न घेता परस्पर बदल केल्यास अशा उत्पादक, वितरक व वाहनधारकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी ‘विशेष तपासणी मोहीम’ राबविण्यात येणार आहे. “ई-बाईक्स’ मध्ये मान्यता प्राप्त संस्थेची परवानगी न घेता बदल केल्यास उत्पादक, वितरक व वाहनधारकांवर मोटर वाहन कायदा १९८८ नुसार कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना सर्व प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

केंद्रिय मोटार वाहन नियमानुसार २५० वॅटपेक्षा कमी क्षमता असलेल्या तसेच ज्या वाहनांची वेगमर्यादा ताशी २५ किलामीटर पेक्षा कमी आहे अशा ‘ई-बाईक्स’ना नोंदणीपासून सूट आहे. मात्र काही वाहन उत्पादक मान्यताप्राप्त संस्थेने दिलेल्या प्रमाणपत्राशिवाय ‘ई-बाईक्स’ची विक्री करतात.

तसेच ज्या ‘ई-बाईक्स’ना वाहन उत्पादन करण्याची मान्यता मिळाली आहे अशा वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल करुन अशा वाहनांची बॅटरी क्षमता २५० वॅट पेक्षा जास्त करतात. अथवा वाहनांची वेगमर्यादा ताशी २५ किलोमीटरपेक्षा अधिकची करतात.

अशाप्रकारे बेकायदेशीर बदल करुन वाहन विक्री केल्यास रस्ता सुरक्षेस गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच ‘ई-बाईक्स’ना आग लागून अपघात होत असल्याच्या घटना वारंवार निदर्शनास आलेल्या आहेत. याची तपासणी होणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts