अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 : थोर संत तुकडोजी महाराज यांची आज जयंती आहे. त्यांचं पूर्ण नाव हे माणिक बंडोजी इंगळे असं होतं. त्यांचा जन्म ३० एप्रिल १९०९ ला अमरावती जिल्ह्यातील यावली गावात झाला.
तुकडोजी महाराजांनी लहानपणी आत्म-अनुभूतीसाठी कठोर तपश्चर्या आणि आध्यात्मिक व्यायाम केले होते. त्यांनी समाजसुधारणेच्या दृष्टीकोनातून धर्म, समाज, राष्ट्र आणि शिक्षणात सुधारणेसाठी अनेक लेख लिहिले होते त्यांनी संपूर्ण भारतभर आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचं प्रबोधन केलं.
सन १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात त्यांना अटक झाली होती. त्यांनी अंधश्रद्धा व जातिभेदाच्या निर्मुलनासाठी आपल्या भजनांचा आणि कीर्तनाचा वापर केला.
त्यांनी लिहिलेल्या ग्रामगीतेत ग्रामविकासाच्या साधनांचं वर्णन केलेलं आहे. स्वातंत्र्यानंतर तुकडोजी महाराजांनी ग्रामीण विकासावर आपलं लक्ष केंद्रित केलं होतं त्यामुळं त्यांचं योगदान लक्षात घेता तात्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत ही पदवी दिली होती.
तुकडोजी महाराज हे विश्व हिंदू परिषेदेच्या संस्थापक उपाध्यक्षांपैकी एक होते. त्यांनी बंगाल दुष्काळ (१९४५), चीन युद्ध (१९६२) आणि पाकिस्तानचा हल्ला (१९६५), कोयना भूकंप विनाश (१९६२) या काळात राष्ट्रीत हेतू लक्षात घेऊन अनेक आघाड्यांवर मदव व पूनर्वसन करण्याचं काम केलं होतं. ११ ऑक्टोबर १९६८ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.