नगरकरांसाठी जे काम करतात त्यांना बदनाम करून स्वताची राजकीय पोळी भाजू नये !

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस चे पदाधिकारी सातत्याने आ संग्राम जगताप यांच्यावर टीका करत आहेत यावर प्रत्युत्तर म्हणून शहरातील नगरसेवक विपुल शेटीया यांनी याबाबत पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

यात ते म्हणाले आ. संग्राम जगताप व संपूर्ण जगताप कुटुंबियांचे कोविड – १९ च्या काळातील योगदान अतिशय उल्लेखनीय व संपूर्ण महाराष्ट्रात आदर्शवत आहे. कोरोना महामारीच्या काळात असंख्य गोरगरीब , गरजुवंतांना विनामुल्य रेशन वाटप , औषधे व रुग्णालयातील औषधोपचार इ. सर्व सेवा-सुविधा आ. जगतापांनी दिल्या आहेत.

भीतीपोटी स्वतःच्या घरातील व्यक्ती / नातेवाईक जवळ येत नसताना आ. साहेबांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोविड रुग्णाच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाईकांना धीर देऊन स्वतः हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आहे.

स्वतः रणांगणात उतरून हॉस्पिटमध्ये रात्र रात्र बसून रुग्णांना आधार व मायेचा हात देऊन त्यांना धीर दिला आहे . आ. अरुणकाका जगताप यांच्या माध्यमातून आनंदऋषीजी हॉस्पिटलला जागा मिळाली व आज या हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्णांना उपचार मिळत आहेत.

बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलला आजपर्यंत १९ कोटी रुपये निधी आणून दिला असून हॉस्पिटलची सर्व व्यवस्था उभारण्याचे काम आ. संग्राम भैय्या जगताप यांनी हाती घेतले आहे.

ज्याप्रमाणे तूप खाऊन लगेच रूप येत नाही त्याला काही कालावधी जावा लागतो त्याचप्रमाणे अल्पावधीतच बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलची अद्ययावत इमारत उभारलेली दिसेल.

सन्माननीय आ. साहेबांबद्दल कोणीही ऐऱ्या-गैऱ्याने अर्वाच्य व वाचाळपणे केलेले वक्तव्य नगरची सुज्ञ व विचारवंत जनता कधीही सहन करणार नाही. मनोज गुंदेचा यांचे शहरासाठी कोणतेही योगदान नाही. त्यांनी आधी स्वतःची ओळख निर्माण करावी ,

समाजासाठी झटावे व नंतर प्रश्न विचारावेत. अहोरात्र नगर करांसाठी जे झटतात व काम करतात त्यांना अशा पद्धतीने बदनाम करून स्वता प्रसिद्ध होण्याचा डाव करणार्यानी स्वताची राजकीय पोळी भाजू नये असे विपुल शेटीया यांनी पत्रकात संगितले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts