100 कोटी हिंदूंना बदनाम करू नका – बाबा रामदेव

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-  देशात सापडणाऱ्या विषाणूला ‘भारतीय स्ट्रेन’ किंवा ‘मोदी स्ट्रेन’ असे संबोधण्याचे कथित टूल किट जारी करून काँग्रेस जगभरात देशाची आणि

विशेषत: पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा मलिन करू पहात आहे, असा आरोप भारतीय जनता पार्टीने मंगळवारी केला.

परंतु काँग्रेसने हे टूलकिट बनावट असल्याचा सांगत याचा इन्कार केला आहे. आता, योगगुरू बाबा रामदेव यांनीही टूल किट प्रकरणावरून अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर निशाणा साधला आहे. टूलकिट प्रकरणावरून भाजपा आणि काँग्रेस आमने-सामने आले असतानाच आता बाबा रामदेव यांनीही यात उडी घेतली आहे.

बाबा रामदेव यांनी टूलकिटवरून 100 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या हिंदूंना बदनाम करू नका, असे म्हटले आहे. कुंभमेळा, सनातन हिंदू धर्माला बदनाम करणे, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कट हे पाप आणि गुन्हा आहे. तुम्ही अतिशय वाईट काम करत आहात.

देश तुम्हाला कधीही माफ करणार नाही. देशातील लोकांनी अशा सनातनी आणि भारतविरोधी शक्तींचा एकत्र येऊन बहिष्कार करायला हवा.

जे लोक असे करत आहेत, त्यांना माझी हात जोडून विनंती आहे. तुम्ही राजकारण करा, पण 100 कोटींपेक्षा जास्त असलेल्या हिंदू्ंचा अपमान करू नका असे बाबा रामदेव म्हणाले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts