ताज्या बातम्या

Whatsapp Tips : चुकूनही करू नका ‘या’ चुका, नाहीतर तुम्हालाही खावी लागणार जेलची हवा

Whatsapp Tips : सध्याच्या काळात अनेकजण व्हॉट्सअॅपचा वापर करत आहेत. व्हॉट्सअॅपही आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत भन्नाट फीचर्स आणत असते. याचा फायदाही त्यांना होतो. व्हॉट्सअॅप वापरत असताना त्याचे काही नियम आणि अटींचे पालन करावे लागते.

अनेकांना या नियम आणि अटींबद्दल माहिती असूनही ते उल्लंघन करतात. जर तुम्हीही असे करत असाल तर वेळीच सावध व्हा नाहीतर तुम्हाला जेलची हवा खावी लागेल.तसेच तुम्हाला दंडही भरावा लागू शकतो.

करू नका या चुका

नंबर १

जेव्हा तुम्ही व्हॉट्सअॅपवर कोणाशीही बोलत असता तेव्हा चुकूनही कोणालाही धमकावू नका. ती व्यक्ती ओळखीची असो वा अनोळखी व्यक्ती असो. जर तुम्ही असे करत असाल तर तुमच्या विरोधात तक्रार केली जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता.

नंबर २

तसेच तुम्ही व्हॉट्सअॅपद्वारे कोणताही प्रक्षोभक संदेश,व्हिडिओ, कोणतेही पोस्टर किंवा दंगल घडेल असा कोणताही संदेश पाठवू नका, तुम्हाला तुरुंगातही टाकले जाईल. मेसेज फॉरवर्ड करत असताना त्याबद्दल अगोदर जाणून घ्या आणि मगच फॉरवर्ड करा.

नंबर ३

कोणत्याही महिलेला कधीच चुकीचा संदेश पाठवू नका. जर तुम्ही असे करत असाल तर तुमच्याविरोधात तक्रार होऊ शकते. असे झाल्यास तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते.

नंबर ४

वेगवेगळ्या धर्माचा प्रत्येकाने आदर करावा. जर तुम्ही व्हॉट्सअॅपवर ग्रुप बनवून धर्माच्या विरोधात मेसेज पाठवत असाल तर त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात. किंवा कोणाचा जीव गेला असेल तर तुम्हाला तुरुंगात जावे लागेल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts