Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या जीवनानुभवातून काही विचार सर्वांसोबत शेअर केले आहेत. त्याचा आज अनेक लोकांसाठी खूप फायदेशीर ठरत आहेत. चाणक्य यांनी प्रत्येक विषयावर सखोल विचार केल्यानंतर त्याचे चांगले तसेच वाईट परिणाम नीतीशास्त्रात सांगितलेले आहे.
एखाद्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात कसे वागावे? आपल्या मित्रासोबत कसे संबंध असावेत? यांसारख्या अनेक प्रश्नाची उत्तरे त्यांनी दिली आहे. इतकंच नाही तर त्यांनी चुकूनही कोणाला काही गोष्टी सांगू नका असे सांगितले आहे. जर तुम्ही या गोष्टी कोणाला सांगितल्या तर तुमचे आयुष्य उध्वस्त होईल.
स्वतःची कमजोर बाजू सांगू नका
आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार, भावनेच्या आहारी जाऊन कधीही कोणाच्याही समोर आपली कमजोर बाजू सांगू नका. कारण तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊन लोक संधी मिळताच तुमचे खूप मोठे नुकसान करू शकतात. त्यामुळे तुमची कमजोरी स्वतःपुरती मर्यादित ठेवावी.
दुसऱ्याचे रहस्य सांगू नका
जर एखाद्या व्यक्तीने आपले रहस्य तुम्हाला सांगितले असेल तर चुकूनही ते कोणाला सांगू नका. कारण त्या व्यक्तीने तुमच्यावर विश्वास ठेवूनच गुपित शेअर केले आहे. जर तुम्ही हे दुसऱ्याला सांगितले तर त्या व्यक्तीच्या विश्वासाला तडा जातो.
नेहमी तुमचे उत्पन्न लपवून ठेवा
तुमची किंवा तुमच्या कुटुंबाची कमाई आणि संपत्तीशी निगडित कोणतीही माहिती कधीही कुणाला सांगू नका. कारण यामुळे लोक तुमचे नुकसान करू शकतात. त्यामुळे कायम हे लक्षात ठेवा की तुमची आर्थिक स्थिती कशीही असेल, कोणाच्याही समोर सांगू नका.
भविष्यातील नियोजन सांगणे टाळावे
जर तुम्ही भविष्यात यशस्वी होण्याची योजना आखत असाल तर कायम हे लक्षात ठेवा की याबद्दल तुमच्या कुटुंबाशिवाय इतर कोणालाही सांगणे टाळा. कारण अनेकांना यशस्वी व्यक्तीचा हेवा वाटत असून त्याच्या मार्गात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत असतात. त्यामुळे तुमच्या नियोजनाबद्दल कोणालाही सांगू नका.