मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 चा हंगाम आता प्लेऑफच्या टप्प्यात प्रवेश करणार आहे. यावर्षी चेन्नई सुपर किंग्सने (CSK) चांगली कामगिरी केली नसून आता अजून एक झटका चेन्नईला बसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोसमाच्या सुरुवातीला कर्णधारपदाची (captaincy) धुरा सांभाळणारा रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आता संपूर्ण स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो.
वास्तविक, जडेजा सध्या दुखापतीशी झुंजत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याला ही दुखापत झाली. चेन्नईने हा सामना गमावला. यानंतर संघाचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होता, ज्यात जडेजा दुखापतीमुळे खेळला नाही. दिल्लीविरुद्धच्या या सामन्यात चेन्नईने विजय मिळवला.
प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता नाही
खराब कामगिरीमुळे जडेजाने पुन्हा धोनीकडे कर्णधारपद सोपवले आहे. अशा परिस्थितीत चेन्नई संघाने आतापर्यंत एकूण ११ सामने खेळले असून त्यापैकी केवळ ४ सामने जिंकले आहेत. हा संघ ८ गुणांसह गुणतालिकेत 9व्या क्रमांकावर आहे. तसेच चेन्नई संघाच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशाहीआता कमी झाली आहे.
परंतु जर राजस्थान रॉयल्स (RR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला तर दोघांचे 16-16 गुण होतील. अशा स्थितीत चेन्नई पूर्णपणे स्पर्धेतून बाहेर पडेल, कारण CSK संघाला आता फक्त 3 सामने खेळायचे आहेत. चेन्नईच्या संघाने तिन्ही सामने जिंकले तरीही त्यांचे केवळ 14 गुण असतील.
CSK जडेजावर धोका पत्करू इच्छित नाही
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चेन्नई संघ व्यवस्थापनाने नुकतेच जडेजाच्या दुखापतीचे मूल्यांकन केले होते, त्यानुसार त्याला लवकर बरे होणे खूप कठीण आहे. चेन्नई संघाला आता या लीगमध्ये केवळ ३ सामने खेळायचे असून ते प्लेऑफमध्ये पोहोचण्याची अपेक्षा नाही. अशा परिस्थितीत CSK संघ जडेजाबाबत कोणताही धोका पत्करू पाहत नाही. त्यामुळे जडेजाला स्पर्धेतून विश्रांती दिली जाऊ शकते.
अहवालांवर विश्वास ठेवला तर, जडेजा आणि चेन्नई संघात काहीही चांगले नाही. चेन्नई संघ व्यवस्थापनानेही रवींद्र जडेजाला सोशल मीडिया अकाउंटवर (social media account) अनफॉलो (Unfollow) केले आहे. सोशल मीडियावरच हा दावा केला जात असला तरी आता लवकरच जडेजाच्या बाहेरची घोषणाही होईल असे मानले जात आहे.
रवींद्र जडेजाने आयपीएल २०२२ च्या हंगामात आतापर्यंत १० सामने खेळले असून, १९.३३ च्या सरासरीने त्याने केवळ ११६ धावा केल्या आहेत. या मोसमात जडेजा गोलंदाजीतही फिका दिसत होता. गोलंदाजीत त्याने केवळ ५ विकेट्स घेतल्या आहेत.
अलीकडेच, सय्यद किरमाणी, जो १९८३ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज होता, त्याने आज तकला सांगितले होते की जडेजाला चेन्नई संघाच्या उर्वरित खेळाडूंचा कर्णधार म्हणून पूर्ण पाठिंबा मिळाला नसावा.
यामुळेच त्याच्यात आत्मविश्वासाची कमतरता होती आणि त्याचा त्याच्या खेळावरही परिणाम झाला. खराब कामगिरीमुळे एखाद्या खेळाडूने कर्णधारपद सोडले तर त्यात लाज वाटण्याचे कारण नाही, असे किरमाणी म्हणाले आहेत. तसेच धोनीच्या काळात जडेजाला कर्णधार बनवण्यात आल्याने संघात मत्सराची भावना निर्माण झाली असावी, असेही किरमाणी म्हणाले होते.