अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फोफावत आहे.यातच सर्वाधिक रुग्णवाढ हि मुंबईमध्ये होताना दिसून येत आहे.
यातच संगमनेर आगारातील चालक व वाहकांना आठ मेपासून मुंबई “बेस्ट’ वाहतूक कर्तव्यावर पाठविण्यात येणार आहे.
मात्र यास वाहक – चालकांनी नकार दिला आहे. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असला तरीही या परिस्थितीत राज्य परिवहन महामंडळाची सेवा (अत्यावश्यक साठी) सुरु आहे.
यातच मुंबईतील अंतर्गत वाहतुकीच्या “बेस्ट’ बसवर कर्तव्य बजावण्यास संगमनेर आगारातील चालक व वाहकांना पाठवण्याचा निर्णय झाला आहे.
मात्र सध्याच्या परिस्थितीत मुंबईत मोठ्या प्रमाणावर कोविडचे रुग्ण आढळत असल्याने, या कर्तव्यावर जाऊन जिवाची बाजी लावण्यास कर्मचारी तयार नसल्याचे निवेदन आगार व्यवस्थापकांना दिले आहे.
मुंबईतील कोरोनाच्या प्रादुर्भावाने संगमनेर आगारातील चालक बी. आर. नंदकर, बी. के. सातपुते व बी. आर. खेमनर यांचा मृत्यू झाला होता. तर आजवर 50पेक्षा अधिक कर्मचारी बाधित झाले आहेत.
जीवाची बाजी लावूनही प्रशासनाकडून कर्मचाऱ्यास कोणत्याही प्रकारचे विमाकवच, तसेच आरोग्यसेवा दिली जात नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर संगमनेर आगारातील कोणालाही “बेस्ट’ वाहतूकीसाठी मुंबईत पाठवू नये, असे निवेदन आगार व्यवस्थापक नीलेश करंजकर यांना देण्यात आले आहे.