ताज्या बातम्या

Driving Licence: ड्रायव्हिंग लायसन्स हरवले तर आता काळजी नाही ! ‘या’ सोप्या पद्धतीने बनवा तुमचा डुप्लिकेट डीएल

Driving Licence: देशातील कोणत्याही भागात गाडी चालवण्यासाठी तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर तुम्हाला ट्रॅफिक पोलीस दंडही देऊ शकते. यामुळे तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.

मात्र कधी कधी आपल्याकडे असणारा ड्रायव्हिंग लायसन्स देखील हरवतो त्यामुळे देखील अनेक अडचणीला सामोरे जावे लागतो म्हणून आता आम्ही तुम्हाला काही सोप्या स्टेप सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स बनवू शकतात. चला तर जाणून घ्या तुम्ही डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स कसा बनवू शकतात.

हे काम आधी करा

तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स हरवला किंवा चोरीला गेला आहे आणि आता तुम्हाला डुप्लिकेट डीएल मिळणार आहे, त्याआधी एक गोष्ट करा. तुम्हाला तुमच्या जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये हरवलेल्या डीएलसाठी एफआयआर नोंदवावा लागेल, कारण डुप्लिकेट डीएल बनवताना त्याची आवश्यकता असेल.

डुप्लिकेट डीएल याप्रमाणे बनवता येईल

स्टेप 1

जर तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स कुठेतरी हरवला असेल आणि तुम्हाला डुप्लिकेट DL घ्यायचा असेल तर तुम्हाला राज्य परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

स्टेप 2

यानंतर, येथे तुम्हाला मागितलेली सर्व माहिती अचूक भरायची आहे. नंतर lld फॉर्म भरा आता भरलेल्या फॉर्मची प्रिंट काढा

स्टेप 3

त्यानंतर या भरलेल्या फॉर्मसोबत आवश्यक कागदपत्रे जोडा त्यानंतर आरटीओ कार्यालयात फॉर्म आणि कागदपत्रे जमा करा या प्रकरणात, सर्वकाही योग्य असल्याचे आढळल्यास, 30 दिवसांनंतर तुम्हाला डुप्लिकेट डीएल जारी केले जाईल.

हे पण वाचा :- iPhone 13 Offers : धमाका ऑफर ! अँड्रॉइड फोनपेक्षा स्वस्तात खरेदी करा आयफोन 13 ; जाणून घ्या कसा होणार फायदा

Ahmednagarlive24 Office

Recent Posts