मंत्री गडाखांच्या प्रयत्नांमुळे तालुक्याचा गुदमरलेला श्वास मोकळा होणार

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-नगर जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भावामुळे वैद्यकीय सेवांचा तुटवडा सातत्याने जाणवतो आहे. यातच बेड, ऑक्सिजन , व्हेंटिलेटर आदींचा देखील तुटवडा कायम आहे.

यातच ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी नगर जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये ऑक्सिजन प्लान्ट सुरु करण्यात येत आहे.

यातच लोकप्रतिनिधी तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नांतून नेवासा तालुक्यातील रुग्णांचा गुदमरलेला श्वास मोकळा होणार आहे.

गडाखांच्या प्रयत्नाने नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात तातडीने सुमारे दीड कोटी रुपयांचा ऑक्‍सिजन निर्मिती प्रकल्प साकारत आहे.

नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात होत असलेला ऑक्‍सिजन प्रकल्प हा तमिळनाडूमधील कोइंबतूरची फॅरेडे ओझोन ही कंपनी बनविणार असून,

सुमारे दीड कोटीचा हा प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पात दिवसाला सुमारे दीडशे सिलिंडर ऑक्‍सिजन तयार होणार आहे.

दरम्यान, कोरोना संकट काळात ऑक्‍सिजन पुरवठ्याचा प्रश्‍न गडाखांच्या प्रयत्नाने सुटल्याने तालुक्‍यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts