E-Passport: आंतरराष्ट्रीय प्रवास सुलभ करण्यासाठी आणि पासपोर्ट धारकाचा डेटा सुरक्षित करण्यासाठी भारत सरकार (Government of India) लवकरच ई-पासपोर्ट सुरू करणार आहे. सरकारने गेल्या वर्षीच ई-पासपोर्ट (E-passport) संकल्पनेची घोषणा केली होती. आता परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी या वर्षाच्या अखेरीस रिलीज होणार असल्याची पुष्टी केली आहे.
एस जयशंकर म्हणाले की, सरकारला ई-पासपोर्टच्या माध्यमातून नागरिकांचा अनुभव आणि सार्वजनिक वितरण सुधारायचे आहे. चिप आधारित ई-पासपोर्ट नवीन नाही. 100 हून अधिक देशांमध्ये चिप पासपोर्ट (Chip passport) जारी करण्यात आले आहेत.
ई-पासपोर्ट म्हणजे काय? –
ई-पासपोर्ट देखील सामान्य भौतिक पासपोर्टप्रमाणे काम करेल. त्यात एक छोटी इलेक्ट्रॉनिक चिप (Electronic chip) असेल. हे ड्रायव्हिंग लायसन्स (Driving license) मध्ये चिपसारखे दिसू शकते. ही चिप पासपोर्ट धारकाचे नाव, पत्ता आणि इतर माहिती यांसारखे आवश्यक तपशील संग्रहित करेल.
ई-पासपोर्ट रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) चिप वापरेल. त्याच्या मागील कव्हरवर अँटेना असेल. याद्वारे, अधिकारी प्रवाशाच्या तपशीलाची त्वरित पडताळणी करू शकतात. यामुळे बनावट पासपोर्ट कमी होऊ शकतात आणि डेटा टॅम्परिंगची शक्यताही कमी होईल.
ई-पासपोर्ट कोण बनवणार? –
टेक कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) यावर काम करत आहे. या वर्षाच्या अखेरीस ई-पासपोर्ट जारी केला जाईल. भारत सरकारनेही याला दुजोरा दिला आहे. अहवालानुसार, TCS यासाठी MEA सोबत नवीन कमांड आणि कंट्रोल सेंटर स्थापन करत आहे.
जुन्या पासपोर्टधारकाचे काय होणार? –
सध्या तरी सरकारने याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. तो जारी केल्यानंतर, नवीन पासपोर्ट धारकालाच ई-पासपोर्ट जारी केला जाईल. मात्र, जुन्या पासपोर्टसाठी यासाठी अर्ज करावा लागणार की जुन्या पासपोर्टची मुदत संपण्याची प्रतीक्षा करावी लागणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.