Cholesterol : धावपळीच्या जगात आरोग्याकडे अनेकजण लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यापैकी एक म्हणजे कोलेस्ट्रॉल. देशातील अनेकजण कोलेस्ट्रॉलने त्रस्त आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे काहीजणांना तर कितीही उपचार केले तरी फरक पडत नाही.
वाढत्या कोलेस्ट्रॉलमुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. परंतु, तुम्ही आता कोणतेही उपचार ना घेता वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करू शकता. त्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त दिवसातून एकदा एवोकॅडो या फळाचे सेवन करावे लागणार आहे.
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हे फळे खा
प्रसिद्ध आहारतज्ज्ञ आयुषी यादव यांनी एका मुलाखतीत सांगितले की “रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी एवोकॅडोचे सेवन करणे फायद्याचे ठरेल. हे एक महागडे फळ असून मागील काही वर्षांत हे फळ खाण्याचा ट्रेंड वाढला आहे. या फळामुळे हृदयाचे आणि डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. तसेच शरीराच्या सर्वांगीण विकासातही याचा खूप फायदा होतो.”
असतात पोषक घटक
यात सुमारे 240 कॅलरीज, 13 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 3 ग्रॅम प्रथिने, 22 ग्रॅम चरबी (15 ग्रॅम मोनोअनसॅच्युरेटेड, 4 ग्रॅम पॉलीअनसॅच्युरेटेड, 3 ग्रॅम सॅच्युरेटेड), 10 ग्रॅम फायबर आणि 11 एमडी ग्रॅम असते. त्यामुळे हे कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी चांगले आहे.
हे आहेत फायदे
अनेक लोकांना सुमारे 6 महिने एवोकॅडो खायला देऊन त्यावर संशोधन करण्यात आले. यामध्ये संशोधकांना असे आढळून आले की, हे फळ खाल्ल्याने कंबर आणि पोटावरील चरबी कमी होऊन रक्तवाहिन्यांमधील कोलेस्टेरॉलचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे तुम्हीही तुमच्या आरोग्यासाठी तुम्ही हे फळ खाऊ शकता.