ताज्या बातम्या

EDLI Scheme : EPFO च्या ‘या’ योजनेतंर्गत मिळते 7 लाखांपर्यंतचे विमा संरक्षण, जाणून घ्या डिटेल्स

EDLI Scheme : भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) नोकरदारांसाठी अनेक सुविधा सुरु केल्या असून यापैकीच एक म्हणजे एम्पॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (EDLI) योजना.

या योजनेतंर्गत कर्मचाऱ्यांना 7 लाखांपर्यंतचे विमा संरक्षण (Insurance coverage) दिले जाते. खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येतो.

त्याचबरोबर,EPFO च्या सर्व सदस्यांना (EPFO members) हा विमा (Insurance ) लागू असतो.

EDLI योजना काय आहे

आकस्मिक मृत्यू झाल्यास EPFO ​​आपल्या सदस्यांच्या कुटुंबाला विमा संरक्षणाचा लाभ देते. EPFO च्या EDLI योजनेअंतर्गत, ग्राहकाचा अचानक मृत्यू झाल्यास, त्याच्या नॉमिनीला 7 लाख रुपयांपर्यंतची विमा रक्कम दिली जाते.

जर एखादी व्यक्ती EPFO ​​चा सदस्य असेल आणि त्याने सलग 12 महिने काम केले असेल, तर त्याचा आकस्मिक मृत्यू (Sudden death) झाल्यास, त्याच्या कुटुंबातील सदस्यांना 7 लाख रुपयांच्या विमा रकमेचा लाभ दिला जाईल.

हे विमा संरक्षण अशा लोकांना देखील उपलब्ध आहे ज्यांनी एका वर्षात एकापेक्षा जास्त ठिकाणी काम केले आहे. कर्मचाऱ्याचा अचानक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांच्या वतीने विम्याचा दावा केला जाऊ शकतो.

EDLI योजनेतील हक्क सांगणारा सदस्य हा कर्मचाऱ्याचा नॉमिनी (Nominee) असावा. कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतरही या विमा संरक्षणाचा लाभ मिळतो.

दावा कसा करायचा

EPFO सबस्क्राइबरचा अचानक मृत्यू झाल्यास, त्याचे नॉमिनी किंवा वारस या विमा संरक्षणासाठी दावा करू शकतात. दावा करण्यासाठी, विमा कंपनीला कर्मचार्‍याचे मृत्यू प्रमाणपत्र, उत्तराधिकार प्रमाणपत्र, अल्पवयीन नॉमिनीच्या वतीने अर्ज करणाऱ्या पालकाचे प्रमाणपत्र आणि बँक तपशील प्रदान करावे लागतील.

कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत

EPFO च्या EDLI योजनेंतर्गत विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रीमियम म्हणून वेगळे पैसे भरावे लागणार नाहीत. या योजनेत योगदान हे नियोक्ता म्हणजेच तुम्ही जिथे काम करत आहात त्या संस्थेद्वारे केले जाते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts