वीजचोरी करणाऱ्या आठ ग्राहकांना एक लाखाहून अधिकचा दंड

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर पाथर्डी मधील महावितरणकडून धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत महावितरणच्या पथकाकडून वीजचोरांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

यामध्ये पाथर्डी शहरातील आठ ग्राहकांवर ५ हजार ७०३ युनिट चोरी केल्याप्रकरणी १ लाख ३ हजार ४४० रुपये दंड केल्याची माहिती शहर सहायक अभियंता मयूर जाधव यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, पाथर्डी शहरातील वामनभाऊ नगर, म्हस्के कॉलनी, विजयनगर, नाथनगर या भागात कारवाई करून दंडात्मक रक्कम भरण्याची नोटीस देण्यात आली आहे.

दंडाची रक्कम भरण्यासाठी चोवीस तासांची मुदत महावितरण कार्यालयाकडून देण्यात आली आहे. संबंधित दंड न भरणाऱ्या ग्राहकांवर यापुढची कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts