Maharashtra news : राज्यातील सत्ता नाट्याला आता वेगळे वळण आले आहे. राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नव्हे तर एकनाथ शिंदे असणार आहेत.
ते आज सायंकाळी साडेसात वाजता एकटेच शपथ घेणार आहेत, अशी घोषणा खुद्द फडणवीस यांनी केली.नव्या सरकारमध्ये आपण स्वत: कोणतेही पद घेणार नाही. केवळ बाहेरून देखरेख ठेवणार.
काही दिवसांत आणखी काही नेते मंत्री पदाची शपथ घेतली, असे फडणवीस यांनी जाहीर केले.ही मोठी घोषणा मानली जात असून आगामी काळासाठी भाजपकडून ही मोठी खेळी खेळली गेल्याचे मानले जात आहे.