मुंबई : महाराष्ट्राचे (Maharashtra) नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा (NCP President) शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली असल्याची चर्चा अख्या महाराष्ट्रात रंगली होती. मात्र या सर्व चर्चांना एकनाथ शिंदे यांनी पूर्णविराम दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत या फोटो मागील खुलासा केला आहे.
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांचा हातात फुलांचा गुच्छ असलेला फोटो (Photo) सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल (Viral) झाला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची भेट का घेतली? असाच प्रश्न सर्वाना पडला होता.
मात्र एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट करत या सर्व गोष्टी खोट्या असल्याचे सांगितले आहे. तसेच मी मुख्यमंत्री झाल्यापासून शरद पवार यांची भेट घेतली नसल्यचे स्पष्टीकरणही एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
एकनाथ शिंदे यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे की, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मी भेटल्याची बातमी काही प्रसारमाध्यमांनी दिलेली आहे. ही बातमी संपूर्णपणे चुकीची असून त्यात अजिबात कोणतेही तथ्य नाही.
या बातमीसोबत व्हायरल झालेला फोटो हा मी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला गेलो होतो तेव्हाचा आहे. आमच्यात अद्याप अशी कोणतीही भेट झालेली नसून याबाबत आलेल्या कोणत्याही बातम्यांवर कोणीही विश्वास ठेवू नये… असे ट्विट त्यांनी केले आहे.
शरद पवार यांनी राज्यातील महाविकास आघडी सरकार कोसळल्यानंतर शिवसेनेच्या बंडखोर मदारांना इशारा दिला होता. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचं सरकार आलं आहे.
मात्र बंडखोरांच्या आधारावर सत्तेत आलेलं हे सरकार फार काळ टिकाणार नाही. लवकरच मध्यवधी निवडणुका घ्याव्या लागणार असून सर्व आमदारांनी यासाठी सज्ज रहावं, असा इशाराच त्यांनी बंडखोर आमदारांना दिला होता.