निवडणूक रणधुमाळी ! ओबीसी आरक्षणाविना पार पडलेल्या निवडणुकांचे आज निकाल

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :-  भंडारा आणि गोंदियामधील जिल्हा परिषदांच्या २३ व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या ४५ जागांसाठी निवडणुकांचे निकाल आज लागणार आहेत.

राज्यात ओबीसी आरक्षाविना या निवडणुकांसाठी मतदान झाले असून आज निकल जाहीर होणार आहे. दरम्यान या या निवडणूक निकालावरून राज्याच्या राजकारणातील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे दिसून येत आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील १०६ नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या १५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्व जागांकरिता २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान होणार होते.

त्याचबरोबर चार विविध महानगरपालिकांतील चार रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी देखील २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान होणार होते.

पण सर्वोच्च न्यायालयाच्या १५ डिसेंबर २०२१ च्या आदेशानुसार या कार्यक्रमात अंशत: बदल करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा तात्काळ अनारक्षित करून सर्वसाधारण प्रवार्गातून भरण्यासाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

त्यानुसार काल मतदान झाले. अन्य सर्व जागांसाठी मात्र पूर्वनियोजितपणे २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान पार पडले होते. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील ९३ नगरपंचायतींमधील ३३६ जागांसाठी सरासरी ८१

तसेच भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या २३ आणि त्यांतर्गतच्या पंचायत समितीच्या ४५ जागांसाठी ७३ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या सर्व ठिकाणच्या जागांसाठी आज (बुधवार) सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts