अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या रिक्त झालेल्या सभापती, उपसभापती निवडीसाठी १५ सप्टेंबरला सभेचे आयोजन केले आहे.
सभापतिपदासाठी काँग्रेस इच्छुक असली, तरी शिवसेनेने या पदासाठी मोर्चेबांधणी केली आहे. १५ सप्टेंबरला निवड होणार असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
दरम्यानया सभेला पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले असणार आहे. याबाबतचा आदेश नाशिक विभागीय आयुक्तांकडून महापालिकेला प्राप्त झाला आहे.
महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता असलेल्यानंतर महिला व बालकल्याण समिती विसर्जित केली होती. यानंतर महापौर रोहिणी शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत नव्या १६ सदस्यांची महिला व बालकल्याण समितीवर नियुक्ती करण्यात आली.
यामध्ये राष्ट्रवादीचे ६, शिवसेना ५, भारतीय जनता पक्ष ४, काँग्रेस व बसपा प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे. १५ सप्टेंबरला निवड होणार असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.