सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा ऑगस्ट अखेरपर्यंत स्थगिती

4 years ago

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत म्हणजे पाच महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

सहकारी संस्थाच्या निवडणुका तब्बल पाचवेळा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेसाठी जानेवारीमध्ये २०२० मध्ये या निवडणुका ३ महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने १७ मार्चला पुन्हा ३ महिन्यांचा कालावधी वाढवण्यात आला. पुढे अजून दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. अखेर डिसेंबरला २०२० मुदत संपल्याने १६ जानेवारीला आदेश काढुन पुन्हा तिन महिने मुदतवाढ दिली होती.

मात्र, राज्यात १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असून करोनाकाळातच विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. अन्य राज्यांतही सर्व निवडणुका सुरू आहेत.

अशा वेळी केवळ सहकारी संस्थांच्या निवडणुका वारंवार लांबणीवर टाकणे चुकीचे असल्याने पुन्हा नव्याने २ फेब्रुवारीला आदेश काढुन निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आले. मात्र आता पुन्हा निवडणुका आहे.

त्या स्थितीत सहकार अधिनियमातील १९६० च्या कलम ७३ क मधील तरतुदीनुसार सहकारी संस्थांच्या निवडणुका एका वर्षापेक्षा जास्त कालावधीपर्यंत पुढे ढकलण्याची तरतूद नसल्याने कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत सरकारला निवडणुका पुढे ढकलाव्या लागल्या आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Recent Posts