Electric Bike : देशात इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे अनेकजण इलेक्ट्रिक वाहने वापरू लागले आहेत. परंतु या वाहनांची किंमत जास्त आहे. इलेक्ट्रिक वाहनांची मागणी लक्षात घेता जवळपास सर्वच कंपन्या इलेक्ट्रिक वाहने बनवण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत.
तुम्ही आता खूप स्वस्तात मॅटर एरा कंपनीची सर्वोत्तम इलेक्ट्रिक बाईक खरेदी करू शकता. फ्लिपकार्टवर अशी संधी मिळत आहे. कंपनीची ही 125 किमीची रेंज देणारी शक्तिशाली इलेक्ट्रिक बाईक आहे. त्यामुळे तुमचे इंधनाचे पैसे वाचतील.
जाणून घ्या पॉवरट्रेन..
कंपनीकडून या बाइकमध्ये लिक्विड कूल्ड बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 14 एचपी पॉवर जनरेट करण्यास सक्षम करते. इतकेच नाही तर ही बाईक तुम्हाला 125 किमीची रेंज देईल. या इलेक्ट्रिक बाईकचे कर्ब वजन 180 किलो इतके आहे, त्याशिवाय कंपनीने ती 4-स्पीड गिअरबॉक्ससह सादर केली आहे.
मिळणार जबरदस्त फीचर्स
तुम्हाला कंपनीच्या या इलेक्ट्रिक बाईकमध्ये जबरदस्त फीचर्स पाहायला मिळणार आहेत. यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, 7.0 इंच टचस्क्रीन डिस्प्ले, कीलेस अॅक्टिव्हेशन, ओटीए अपडेट्स, पार्क असिस्ट यासारखे शानदार फीचर्स कंपनीकडून उपलब्ध करून दिली आहेत.
किती असणार किंमत?
कंपनीकडून आपल्या या बाईकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत जवळपास 1.44 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही एक उत्तम बाईक खरेदी करण्याच्या विचारात असल्यास मॅटरची ही जबरदस्त इलेक्ट्रिक बाइक तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरेल. इतकेच नाही तर तिचा लुकही एकदम स्टायलिश देण्यात आला आहे. आता तुम्ही ती सहज फ्लिपकार्टवरूनही ऑर्डर करू शकता.