Electric Bill : वापर जास्त असल्याने उन्हाळ्यात वीजबिल जास्त येते. त्यामुळे सगळ्यांचेच महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडते. या दिवसात फ्रिज एसी, कुलर आणि फॅन सारख्या उपकरणांचा वापर जास्त असतो. परंतु, तुम्ही आता वीज मोफत वापरू शकता.
होय, हे खरंय. कारण जर तुम्ही तुमच्या घराच्या रिकाम्या छतावर एक उपकरण बसवले तर तुम्ही वीज मोफत वापरू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही ही वीज एक दोन वर्षे नव्हे तर आयुष्यभर मोफत वापरू शकता. अनेकजण हे उपकरण घेत आहेत.
काय आहे हे उपकरण
या वीजमुक्त उपकरणाचे नाव आहे ट्यूलिप टर्बाइन, हे लक्षात घ्या की ही एक वाऱ्यावर चालणारी टर्बाइन आहे जी तुम्ही सहज तुमच्या घराच्या छतावर स्थापित करू शकता आणि त्यात एक पॉवर जनरेटर बसवला असल्याने वीज सुरू होण्यास मदत होते.
समजा एकदा वीज निर्मिती सुरू झाली की, तुम्ही ती बॅटरीच्या मदतीने किंवा थेट तुमच्या घरात तिचा वापर करू शकता. यामुळे घराच्या किमान एका मजल्यावरील वीज बिल कमी होऊ शकते. हे एक चमत्कारी उपकरण असून ज्याद्वारे तुम्ही कोणत्याही खर्चाशिवाय वीज निर्माण करू शकता. तसेच तुमच्या घराच्या वीज गरजा पूर्ण करण्यासाठी त्याचा वापर करू शकता.
याला ट्यूलिप टर्बाइन म्हणतात कारण त्याची रचना ट्यूलिप सारखीच आहे. वाऱ्याचा प्रवाह कमी असतानाही ही ट्यूलिप टर्बाइन कार्यरत राहत असून टर्बाइनमध्ये गुंतलेल्या जनरेटरमधून वीज निर्मितीची प्रक्रिया सुरू राहते. जर तुम्हालाही तुमच्या घराचे वीज बिल कमी करायचे असेल किंवा ते पूर्णपणे मोफत करायचे असेल, तर तुम्ही हे उपकरण वापरून, दरवर्षी सुमारे ₹50000 ते ₹100000 ची मोठी बचत करू शकतात.