Electric Cars News : भारतात पेट्रोल (Petrol) डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यातच आता बाजारात नवनवीन इलेक्ट्रिक कार बाजारात उपलब्ध होत आहेत. त्यामुळे पेट्रोल डिझेलपासून (Disel) लवकरच मुक्तता होणार आहे. भारतात इलेक्ट्रिक कारची (Electric Car) मागणी वाढत आहे.
परिणामी, देशातील अनेक प्रमुख कार उत्पादक इलेक्ट्रिक वाहनांच्या संपूर्ण श्रेणीचे उत्पादन करण्यात गुंतलेले आहेत. जर आपण यावेळी भारतात उपस्थित असलेल्या इलेक्ट्रिक कार्सबद्दल बोललो, तर टाटा, महिंद्रा आणि एमजी यांचे वर्चस्व आहे.
आता जपानी कंपनी होंडा (Honda) देखील लवकरच या क्रमात सामील होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, होंडा इलेक्ट्रिक कार बनवण्याचे काम करत आहे.
ही इलेक्ट्रिक कार जागतिक स्तरावर आणि नंतर भारतात लॉन्च केली जाऊ शकते. सध्या या कारची संकल्पना समोर आली आहे.
या संदर्भात, जपानी ऑटो जायंटने (Japanese auto giant) आगामी e:NY1 च्या संकल्पना प्रोटोटाइपचे अनावरण केले आहे. इलेक्ट्रिक SUV खास युरोपियन आणि नॉर्थ अमेरिकन मार्केट लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे.
लूकच्या बाबतीत, Honda e:Ns1 आणि e:Np1 इलेक्ट्रिक SUV प्रमाणेच e:Ny1, येत्या काही दिवसांत चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध केले जातील. e:Ny1 ही संकल्पना डिझाईनच्या दृष्टीने उत्तम कार आहे.
2023 Honda इलेक्ट्रिक SUV बद्दल बोलायचे तर, चीनमधील e:N मालिकेतील हे तिसरे इलेक्ट्रिक वाहन (EV) आहे. Honda ने उघड केले आहे की e:Ny1 इलेक्ट्रिक SUV सर्व-नवीन e:N आर्किटेक्चरवर आधारित असेल.
ही कार भारतात कधी लॉन्च होणार याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही. पण होंडा लवकरच भारतात विद्युतीकरणाकडे वाटचाल करत आपल्या लोकप्रिय सेडान सिटीची हायब्रीड आवृत्ती लॉन्च करणार आहे. या कारची अंदाजे किंमत 18-20 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.