ताज्या बातम्या

Electric Cars News : मार्केटमध्ये जबरदस्त धमाका करण्यासाठी ओलाची ही कार सज्ज, तुम्हालाही लावेल वेड

Electric Cars News : देशातील वाढते इंधनाचे दर (Fuel Rate) पाहता सर्वसामान्य लोकांना त्याची झळ बसत आहे. त्यामुळे त्यांना पेट्रोल आणि डिझेलवरील वाहने आता परवडत नाही. अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहने (Electric Car) बाजारात उपलब्ध करून दिली आहेत.

भारताच्या इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये जबरदस्त यश मिळवल्यानंतर, OLA इलेक्ट्रिकने एक नवीन प्रवास सुरू केला आहे. कंपनीने इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंटमध्ये बाजी मारण्याची तयारीही केली आहे.

19 जून रोजी ‘ओला ग्राहक दिना’च्या निमित्ताने, कंपनीने आपल्या ग्राहकांना तामिळनाडूमधील आगामी उत्पादन युनिटमध्ये आमंत्रित केले. या कार्यक्रमादरम्यान, कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी आगामी ओला इलेक्ट्रिक कारचा टीझर रिलीज केला.

३० सेकंदांच्या टीझरमध्ये ओलाच्या एकाहून अधिक इलेक्ट्रिक कार (OLA Electric Car) दिसत आहेत. याशी संबंधित अधिक माहिती पाहूया.

3 इलेक्ट्रिक कार बाजारात येऊ शकतात

ओलाने जारी केलेल्या टीझरमध्ये तीन कार दिसत आहेत. रिपोर्ट्सनुसार, ईव्ही स्टार्टअप कंपनी एकाच वेळी हॅचबॅक, सेडान आणि एसयूव्ही इलेक्ट्रिक कारवर काम करत आहे.

त्याच वेळी, ओला सेडानचा लूक बर्‍यापैकी एरोडायनामिक आहे. पेट्रोल व्हेरियंटमध्ये असा लूक मिळवणे खूप कठीण गेले असते. टीझरमध्ये वेज शेप फ्रंट, एलईडी लाइटिंग यांसारखी उत्कृष्ट वैशिष्ट्ये दर्शविली आहेत.

15 ऑगस्ट रोजी मिळणार अपडेट

आगामी कारच्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सशी संबंधित माहिती सध्या समोर आलेली नाही. तथापि, ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भावीश अग्रवाल यांनी 15 ऑगस्ट रोजी अधिक माहिती दिली जाईल असे सांगितले आहे.

आगामी इलेक्ट्रिक कार स्केटबोर्ड प्लॅटफॉर्मवर विकसित केली जाऊ शकते. ओला कारची अपेक्षित एक्स-शोरूम किंमत 10 लाखांपेक्षा जास्त असू शकते.

संभाव्य रेंज

अहवालानुसार, आगामी इलेक्ट्रिक कारचे भविष्यकालीन डिझाइन पाहता, 500km पेक्षा जास्त रेंज देणारा बॅटरी पॅक वापरला जाऊ शकतो. याचा अर्थ Ola इलेक्ट्रिक कारमध्ये सुमारे 60-80kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक वापरला जाऊ शकतो. मात्र, हॅचबॅक, सेडान आणि एसयूव्हीमध्ये वेगवेगळी वैशिष्ट्ये मिळतील.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts