Elon Musk:ट्विटर खरेदीचा बहुर्चित खरेदी करार गुरुवारी पूर्ण झाला. टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदीचा करार केला असून आता ट्विटरचा मालकी मस्क यांच्याकडे आली आहे.
त्यांनी पहिल्याच दिवशी मोठा निर्णय घेत ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह व्यवस्थापनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. एलॉन मस्क यांनी १३ एप्रिल रोजी ट्विटर खरेदी करण्याची घोषणा केली होती.
४४ अरब डॉलरमध्ये ट्विटर खरेदी करण्याची ऑफर त्यांनी दिली होती. मात्र, स्पॅम आणि फेक अकाउंटसमुळं ही डील पुढे जाऊ शकली नाही. आता पूर्ण झाला. करार मलाकी हक्क मिळताच मस्क यांनी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना काढून टाकले आहे.
यामध्ये कायदा विभागाचे प्रमुख विजया गड्डे, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल यांचा समावेश आहे. ट्विटरच्या सुमारे साडेसात हजार कर्मचाऱ्यांपुढे संकट ओढवणार असल्याचे चिन्ह आहे.