Emergency LED Bulb Price : स्वस्तात मस्त.. वीज गेली तरी चालू राहतो ‘हा’ बल्ब, किंमत आहे फक्त इतकीच

Emergency LED Bulb Price : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहे. या दिवसात वीज गायब होण्याचे प्रमाण जास्त असते. परंतु तुम्ही आता समस्येवर मात मिळवू शकता. कारण बाजारात असे अनेक इमर्जन्सी एलईडी बल्ब आहेत.

जे वीज गेली तरी कामी येतात. जर तुम्ही हा एलईडी बल्ब घेतला तर तुमची मिनिटात समस्या दूर होऊ शकते, त्यामुळे अनेकजण असे एलईडी बल्ब खरेदी करत आहेत. जे जास्तीत जास्त वेळ बॅकअप देतात. इतकेच नाही तर यावर सूट देखील मिळत आहे. तुम्ही आता हा बल्ब खूप कमीत किमतीत खरेदी करू शकता.

तुम्ही ते तुमच्या स्टडी किंवा ड्रॉईंग रूममध्ये इतकेच नाही तर तुमच्या घरी, किरकोळ दुकाने आणि हॉस्पिटलमध्ये बाथरूममध्ये वापरू शकता. यात तुम्हाला एकूण 6 महिन्यांची वॉरंटी दिली जाते. तसेच कंपनीकडून यात शक्तिशाली लिथियम-आयन बॅटरी दिली असून जी चार्ज होण्यासाठी सुमारे 8 ते 10 तास लागतात. हा 12W इन्व्हर्टर इमर्जन्सी LED बल्ब चालू ठेवल्यानंतर तो आपोआप चार्ज होतो.

किती आहे किंमत ?

या बल्बचे नाव आहे Halonix Prime 12W B22D Inverter Rechargeable Emergency LED बल्ब असून याच्या किमतीबाबत बोलायचे झाले तर त्याची किंमत 585 रुपये इतकी आहे. परंतु या एलईडी बल्बची मूळ किंमत 649 रुपये इतकी असून यावर 10% सवलत देण्यात येत आहे. सामान्य एलईडी बल्बच्या तुलनेत, या बल्बची किंमत जवळजवळ डबल होते, जरी असे असले तरी तो सामान्य एलईडी बल्बपेक्षा खूप चांगला आहे तसेच तो तुम्हाला आपल्याला जास्तीत जास्त वेळ प्रकाश देऊ शकतो.

हा बल्ब पॉवर कट दरम्यान 4 तास लाइटिंग बॅकअप देत असून यात तुम्हाला एकूण 6 महिन्यांची वॉरंटी दिली जात आहे. हा 12W इन्व्हर्टर इमर्जन्सी LED बल्ब चालू ठेवल्यानंतर आपोआप चार्ज होतो. यात शक्तिशाली लिथियम-आयन बॅटरी असून जी चार्ज होण्यासाठी सुमारे 8-10 तास लागतात. हा एलईडी बल्ब इतका पॉवरफुल आहे की वीज गेल्यानंतर तो सुमारे 4 तास चालू राहतो.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts