EMI : तुम्हीही EMI ने त्रस्त आहात का? करा ‘हे’ काम, कमी होईल ओझे

EMI : अनेकजण EMI ने त्रस्त असतात. अनेक उपाय करूनही त्यांची EMI मधून सुटका होत नाही. जर तुम्हीही EMI ने त्रस्त असाल तर तुम्ही काही स्टेप्स फॉलो करू शकता. त्यामुळे तुमचे EMI चे ओझे झटक्यात कमी होईल. कसे ते पहा.

दीर्घ मुदतीची परतफेड

जर अशा प्रकारे कर्जाची परतफेड केली तर एकूण कर्जाची किंमत जास्त असेल. परंतु तुमच्यावर प्रत्येक महिन्याला EMI चा जास्त भार पडणार नाही. शिवाय जास्त परतफेड कालावधीमुळे EMI कमी असणार आहे.

व्याजदरांची तुलना करा

कर्जाचा EMI कमी ठेवण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या बँका आणि वित्तीय संस्थांचे व्याजदर पाहावे लागेल. कारण असे होऊ शकते की तुमची नियमित बँक महाग कर्ज देत असेल आणि तेच कर्ज तुम्हाला इतर कुठून तरी स्वस्तात मिळत असेल.

कर्जाचे पुनर्वित्त करा

याचा अर्थ असा आहे की तुम्हाला दुसऱ्या कर्जदाराकडून नवीन कर्ज घेऊन जुन्या कर्जाची परतफेड करत असेल तर दोन कर्जांमध्ये तुम्हाला 50 ते 100 बेस पॉइंट्स म्हणजेच 0.50 ते 1 टक्के नफा मिळाला तरच तुम्ही हे करावे.

क्रेडिट स्कोअर

हे लक्षात घ्या की स्वस्त कर्ज मिळविण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे चांगला क्रेडिट स्कोअर. असे मानले जाते की 750 च्या वर क्रेडिट स्कोअर चांगला असतो. हे दर्शविते की तुम्ही तुमची मागील देणी वेळेवर भरली असून बँक तुमच्यावर विश्वास ठेवून कमी व्याजदराने तुमचे कर्ज मंजूर करते.

ओव्हरड्राफ्ट सुविधा

हे लक्षात घ्या ही काहीशी प्रीपेमेंटसारखीच असून अनेक बँका गृहकर्जावर ओव्हरड्राफ्ट सुविधा देत असतात. यात तुम्हाला एक खाते दिले जाते ज्यात तुम्ही तुमच्या मासिक EMI वर पैसे जमा करता. गरज पडली तर त्यातून पैसेही काढता येतात.

प्रीपेमेंट

समजा तुम्ही सतत काही एकरकमी पैसे जमा करत असाल, तर सोबत कर्जाचे प्रीपेमेंट करणे गरजेचे आहे. जर तुम्ही दरवर्षी कर्जाच्या शिल्लक रकमेचे 5% प्रीपेमेंट केल्यास 20 वर्षांचे कर्ज फक्त 12 वर्षांत पूर्ण होऊ शकते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts