EPFO Update : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी लवकरच आपल्या सदस्यांना आनंदाची बातमी देऊ शकते. कारण आता लवकरच त्यांच्या खात्यात 80,000 रुपये पाठवले जाणार आहे. ईपीएफओच्या पीएफ खात्यावर मिळणारे व्याजाचे पैसे त्यांना दिले जाणार आहेत.
कर्मचाऱ्यांना आता 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 8 टक्के व्याज मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच कर्मचाऱ्यांना लॉटरी लागू शकते अशी चर्चा जोरात सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार या महिन्यात पीएफ खातेधारकांच्या खात्यात व्याजाचे पैसे हस्तांतरित करण्याची शक्यता आहे. परंतु अजूनही यासंदर्भात सरकारकडून अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही. 2022-23 या आर्थिक वर्षासाठी किती व्याज मिळणार याकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष आहे.
हे पण वाचा :- पुण्याच्या शेतकऱ्याचा नादखुळा ! अर्धा एकरात ‘या’ फळपिकाची शेती सुरु केली, अन मिळवलं तब्बल 11 लाखांचं…
केंद्र सरकार आता लवकरच पीएफ कर्मचाऱ्यांसाठी व्याजाची रक्कम जाहीर करणार असून सरकार 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 8 टक्के व्याज देऊ शकते, अशी चर्चा रंगली आहे. जी रक्कम मागच्या इतिहासातील सगळ्यात कमी असली तरी आता महागाईच्या वाढीच्या डोसपेक्षा कमी नाही. सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही मात्र मीडिया रिपोर्ट्स 30 मार्चपर्यंत दावा करत आहेत.
किती व्याज मिळणार? जाणून घ्या
केंद्र सरकार पीएफ कर्मचार्यांना 8 टक्के व्याज देणार आहे, ही मागच्या तेहतीस वर्षांतील सगळ्यात कमी रक्कम आहे, त्यामुळे लोकांची निराशा होत आहे. याआधीच्या आर्थिक वर्षाबद्दल बोलायचे झाल्यास सरकारकडून 8.1 टक्के रक्कम व्याज म्हणून देण्यात आली होती. यापूर्वी 22019-20 या आर्थिक वर्षासाठी 8.5 टक्के व्याज देण्यात येत होते. अशातच आता व्याजाच्या रकमेची व्याप्ती सतत कमी होत चालली आहे.
हे पण वाचा :- पुण्याच्या शेतकऱ्याचा नादखुळा ! अर्धा एकरात ‘या’ फळपिकाची शेती सुरु केली, अन मिळवलं तब्बल 11 लाखांचं…
किती येणार खात्यात रक्कम जाणून घ्या
जर तुम्ही विचार करत असाल की केंद्र सरकारने 8 टक्के व्याज जाहीर केले तर खात्यात किती पैसे रक्कम येणार. समजा आता तुमच्या पीएफ खात्यात 8 लाख रुपये असेल तर 8 टक्के व्याजानुसार तुम्हाला 64,000 रुपये मिळतील. तसेच जर तुमच्या पीएफ खात्यात 10 लाख रुपये जमा असल्यास तुम्हाला 80 हजार रुपये सहजपणे व्याज म्हणून दिले जातील.
हे पण वाचा :- राज्यातील आमदारांना किती पगार मिळतो ? वाचा सर्व माहिती एकाच क्लिकवर