अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- नगर शहरात आतापर्यंत बोल्हेगाव परिसरात तीन ठिकाणी, तसेच आर्यन सोसायटी (बालिकाश्रम रस्ता), सिव्हील हडको, कोहिनूर मंगल कार्यालयासमोरी जयश्री कॉलनी, माणिकनगर, निलायम सोसायटी, सारसनगर-चिपाडे मळा आणि केडगाव या दहा ठिकाणी मायक्रो कंटेन्मेंट झोन केले आहेत.
आर्यन सोसायटीमध्ये पाच विंग्ज आहेत. त्यातील बी आणि सी या दोन विंग्ज सील करण्यात आल्या आहेत. इतर ठिकाणी ये-जा करण्यासाठी बंधने नाहीत. तसेच ज्या घरामध्ये रूग्ण आढळलेले आहेत,
त्या घराच्या आसपास असलेले चाप-पाच घरांचा समावेश कंटेन्मेंट झोनमध्ये करण्यात येत आहे. संबंधित ठिकाणी बॅरिकेट, बांबू लावून त्यांच्याकडे जाण्याचा रस्ता बंद करण्यात आला आहे. तसेच तेथे महापालिका कर्मचारी आणि पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यात रूग्ण वाढ वाढत असली, तरी सर्वाधिक रूग्ण नगर शहरात वाढत आहेत. नगर शहर शहरानंतर राहाता, संगमनेर, कोपरगाव आणि श्रीरामपूर या तालुका ठिकाणाच्या शहरात कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण आढळून येत आहे.
जिल्ह्यात मध्यंतरीच्या काळात मंदावलेला कोरोना पॉझिटिव्हचा आकडा आता पुन्हा पाचशेच्यावर जाऊ लागला आहे. शहरात 857 कोरोनाग्रस्तांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महापालिकेने लॉकडाऊन ऐवजी आता मायक्रो कंटेनमेंटचा पर्याय शोधत 10 ठिकाणी कंटेनमेंट घोषित केले. दरदिवशी कोरोनाबाधितांची वाढती आकडेवारीमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 81 हजारी पोहोचला आहे.
नगर शहरात 40 हजार 800 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील 416 जणांचा मृत्यू झाला तर 857 बाधितांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा पाहता महापालिकेने मायक्रो कंटेनमेंटची घोषणा केली आहे.
शहरात आता कंटेनमेंटची 10 ठिकाणे झाली आहेत. ज्या भागात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढेल त्या भागात कंटेनमेंट घोषित केले जात आहेत.
जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती :-