EPFO : खरंतर सरकार लवकरच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या या सदस्यांच्या खात्यात 50,000 ट्रान्सफर करणार आहे.जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधीया संस्थेचे सदस्य असाल तर तुम्हाला लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे.
लवकरच केंद्र सरकार आता पीएफ कर्मचाऱ्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम ट्रान्सफर करणार आहे, त्यामुळे एकूण 7 कोटी लोकांना याचा मोठा होणार आहे. समजा तुम्हीही पीएफ कर्मचारी असाल तर तुम्हालाही ही संधी मिळणार आहे.
खरं तर, शासनाकडून काही दिवसांपूर्वी व्याजाची रक्कम निश्चित केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची ही प्रतीक्षा 15 जून 2013 पर्यंत संपुष्टात येईल, असे मानण्यात येत आहे. परंतु केंद्र सरकारकडून या तारखेबाबत अजूनही अधिकृतपणे कोणतीही घोषणा करण्यात आली नाही.
मिळणार इतके व्याज
केंद्र सरकारकडून काही दिवसांपूर्वी पीएफ कर्मचाऱ्यांना 8.15 टक्के व्याज देण्याची घोषणा करण्यात आली होती, त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. कोरोनानंतरचे हे असे पहिलेच वर्ष आहे जेव्हा एवढी रक्कम देण्यात येत आहे, नाहीतर मागील तीन वर्षात यापेक्षा कमी व्याज देण्यात आले आहे.
या अगोदर आर्थिक वर्षात पीएफ कर्मचाऱ्यांना 8.1 टक्के व्याज देण्यात येत होते, जे इतिहासात पहिल्यांदाच सगळ्यात कमी रक्कम होती. याबाबत सांगायचे झाले तर 8.5 टक्के व्याज देण्यात येत असल्याने या कर्मचाऱ्यांनाही मोठा धक्का बसला असे बोलले जात आहे. 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 8.15 व्याजाची घोषणा करून, बूस्टर डोस देण्याचे काम निश्चितपणे करण्यात आले आहे.
खात्यात येणार इतके पैसे
लवकर सरकार पीएफ कर्मचाऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम टाकणार आहे. परंतु कर्मचाऱ्यांना पीएफवर किती रुपये व्याज खात्यात जमा होणार हा प्रश्न तुमच्या मनात आला असणार. जर तुमच्या पीएफ खात्यात 5 लाख रुपये जमा केल्यास 42,000 रुपये व्याज म्हणून ट्रान्सफर करण्यात येतील. तुमच्या खात्यात 6 लाख रुपये व्याज आले तर, सुमारे 50,000 रुपये व्याज पाठवले जाईल.