ताज्या बातम्या

EPFO Alert: PF खातेधारक सावधान.., चुकूनही ‘या’ चुका करू नका, नाहीतर होणार ..

EPFO Alert:  देशातील मोठ्या संख्येने नोकरदार (employed) लोकांकडे पीएफ खाते (PF account) आहे. दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या पगारातील काही हिस्सा कापून त्यांच्या पीएफ खात्यात जमा केला जातो.

भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा केलेले पैसे कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरचे (post-retirement life)जीवन आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्याचे काम करतात. त्याचबरोबर आजच्या युगात सायबर गुन्हे (cyber crime) आणि बनावट कागदपत्रांची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक पावलावर सतर्क राहण्याची गरज आहे.

तुमच्या छोट्याशा निष्काळजीपणामुळे मोठे नुकसान होऊ शकते.  कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. अलर्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, पीएफ खातेधारकांनी त्यांच्या खात्याशी संबंधित महत्त्वाची माहिती इतर कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करू नये. तसे केल्यास त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. त्याबद्दल जाणून घेऊया


एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) ने पीएफ खातेधारकांना अलर्टमध्ये त्यांचे आधार कार्ड (Aadhaar card), पॅन कार्ड (PAN card), यूएएन नंबर (UAN number), बँक तपशील (bank details) कोणत्याही व्यक्तीसोबत कधीही शेअर करू नयेत असे सांगितले आहे.

सोशल मीडिया किंवा इतर कोणत्याही ठिकाणी आकर्षक ऑफर देऊन सायबर ठग तुमच्याकडून या तपशीलांची मागणी करत असल्यास, ताबडतोब सतर्क व्हा. अशी माहिती विचारणाऱ्या मेसेज किंवा फेक कॉल्सना उत्तर देऊ नका.

गेल्या काही वर्षांत देशात फिशिंग हल्ल्यांच्या (phishing attacks) घटनांमध्ये वाढ झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात मोठी रक्कम जमा होते. अशा परिस्थितीत, बहुतेक सायबर ठग पीएफ खातेधारकांना लक्ष्य करतात.

येथे फसवणूक केली तर मोठी रक्कम मिळू शकते, याची जाणीव त्यांना आहे. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्हाला असा फिशिंग कॉल येतो तेव्हा तुम्ही ताबडतोब सतर्क होणे आवश्यक आहे. EPFO कधीही व्हॉट्सअॅप, सोशल मीडिया किंवा इतर कोणत्याही माध्यमातून कोणत्याही प्रकारची रक्कम जमा करण्यास सांगत नाही.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts