अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, त्यावर विविध उपाययोजना करणे गरजेच्या आहेत.
कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी लसीकरणाला महत्त्व देण्यासाठी आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व १७ प्रभागांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू करावी, तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मानवी जीवनावर विपरीत परिणाम झाला आहे.
या कोरोना संकट काळामध्ये नागरिक भयभीत झाले आहेत. काही कोरोना रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला आहे. यापुढील काळामध्ये कोरोना रुग्णांवर व्यवस्थित उपचार होण्यासाठी उपाययोजनाची खरी गरज आहे. तज्ञांच्या मते लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती जास्त आहे.
थोड्या प्रमाणात का होईना बाल कोरोना रुग्ण आढळत आहेत. यासाठी आता बालरोग तज्ञ डॉक्टरांची टास्क फोर्स कमिटी स्थापन करावी, जेणेकरून बालकांवर उपचार घेणे सोपे जाईल. अशी मागणी मनपा आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे मनपाच्या आरोग्य समितीच्या वतीने केली.
नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात म्युकर मायकोसीसचे रुग्ण आढळत आहेत. दुर्दैवी काही जणांचा मृत्यू देखील झाला आहे. या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक असलेले इंजेक्शन बाजारामध्ये उपलब्ध होत नाही, तसेच काळ्या बाजारातून मोठी किंमत रुग्णांच्या नातेवाइकांना मोजावी लागत आहे.
यासाठी महापालिकेच्या वतीने तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात, तसेच ॲम्ब्युलन्स चालकांकडून मनमानी पद्धतीने रुग्णांची लूट केली जाते यावर उपाययोजना कराव्यात. RTPCR तपासणीचा रिपोर्ट चोवीस तासाच्या आत देण्यात यावा.
काही लॅब कडून वेळेवर रिपोर्ट दिला जात नसल्याने कोरोनाबाधि रुग्णांकडून संसर्ग होण्याची भीती आहे. नागरिकांत कोरोनाची जनजागृती करावी. आदी मागण्या मनपा आरोग्य समितीच्या वतीने करण्यात आल्या.