अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- सरकारने कष्टकरी घरेलू कामगारांसाठी घरेलू कामगार मंडळ 2011 सायली स्थापन केलेले आहे व ओळखपत्र दिले आहे पण आर्थिक मदत तुटपुंजी दिलेली आहे तरी शासनाने घरेलू कामगारांना भरघोस आर्थिक मदत देऊन कष्टकरू घरेलू कामगारांच्या विविध मागण्या मान्य होण्यासाठी अहमदनगर जिल्हा श्रमिक असंघटित कष्टकरी कामगार संघटनेच्या वतीने पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांना मागणीचे निवेदन देण्यात आले
यावेळी आमदार संग्राम जगताप, स्थायी समिती सभापती अविनाश घुले, अध्यक्ष विलास कराळे पाटील समवेत सरचिटणीस गोरख खांदवे, सुनिता बडकस, जयश्री पाटकूळे, सुनिता देवकाते, कविता ससाने, अनिता कोळगे, भारती अल्हाट, मंगल मदे, संगीता पाटकूळे, मीना सोनवणे, सुनिता काळे, उषा पाटोळे, अनिता पोटे आदी उपस्थित होते.
घरेलू कामगार महिलांचे पतिराज काही प्रमाणात व्यसनाधीन असतात त्या महिलांना आपल्या मुला-मुलींचे शिक्षण व उच्च शिक्षण करण्यासाठी रात्रंदिवस लोकांची धुणी भांडी फरशी पुसणे व इतर पडेल ती कामे मजबुरी म्हणून करावी लागतात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आरोग्याचे प्रश्न हे सोडवण्यासाठी रात्रंदिवस काबाडकष्ट करावे लागतात
त्यांना कुठल्याही प्रकारची सुट्टी नसते कामावर पायपीट करावी लागते राहण्यासाठी निवारा नसतो कुठेतरी भाड्याचे घर घेऊन प्रपंचाचा गाडा चालवावा लागतो तरी शासनाने कष्टकरी घरेलू कामगार यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून 60 वर्षांपूर्वी घरेलू कामगारांना पेन्शन द्यावी
त्यांच्या मुला-मुलींना शिक्षणामध्ये व उच्च शिक्षणामध्ये आर्थिक मदत करावी व शहरांमध्ये शिक्षण घेण्यासाठी मोफत हॉस्टेलची सुविधा करून द्यावी कामावर जाण्यासाठी सरकारने मोफत सायकल द्याव्यात व घरेलू कामगारांच्या सप्ताहाच्या सुट्टीसाठी व सणाच्या सुट्टीसाठी कडक कायदा करावा व त्यामध्ये दंडाची व शिक्षेची तरतूद करावी
शासनाच्या घरकुल योजना मध्ये घरेलू कामगारांना घरे उपलब्ध करून द्यावीत तसेच रेशनिंग अन्नधान्य देखील लवकर मिळत नाही व त्या धान्याचा काळा बाजार होतो व दुकानदार आपल्या दुकानावर देखील बोर्ड लावत नाही अशा अनेक विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले.
देशाला स्वातंत्र्य मिळून 74 वर्षे होऊन गेली आहे तरीपण गरीब कष्टकरी घरेलू कामगारांना सरकारने न्याय दिलेला नाही तरी या निवेदनाची दखल घेऊन घरेलू कामगारांना न्याय देण्याची मागणी अहमदनगर जिल्हा श्रमिक संघटित कष्टकरी कामगार संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.