नवी दिल्ली : घरगुती गॅस (Domestic gas) च्या दरात वाढ झाली असून सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री लागत आहे. यावरच AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी केंद्रावर टीका केली आहे.
कारण घरगुती गॅसच्या दरात ५० रुपयांनी वाढ केल्याबद्दल विरोधी पक्ष केंद्रातील मोदी सरकारवर (Narendra Modi) हल्लाबोल करत आहेत. त्यातच आता असदुद्दीन ओवेसी यांनीही मोठे वक्तव्य केले आहे.
ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींना हे माहीत आहे की, जोपर्यंत मी देशात द्वेषावर बोलत राहीन, गॅसचे दर एक हजार रुपयांनी वाढतील, तोपर्यंत मतदार (Voters) पंतप्रधान मोदींनाच मतदान करतील. उत्पन्न वाढत नसून महागाई वाढत आहे, असा टोला ओवेसी यांनी लगावला आहे.
शनिवारी घरगुती गॅसच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाली. यासह गॅस सिलिंडरच्या (gas cylinder) किमतीने १००० रुपयांचा टप्पा पार केला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीवरून देशभरातील विरोधी पक्ष केंद्र सरकारचा निषेध करत आहेत.
हैदराबादचे खासदार आणि AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींना कळून चुकले आहे की, जोपर्यंत मी देशात द्वेषावर बोलत राहीन, गॅसवर एक हजार रुपये वाढवा, ५० नाही, तोपर्यंत मतदार म्हणेल की मी नरेंद्र मोदींनाच मतदान करेन.”
तसेच केंद्र सरकारवर टीका करताना ओवेसी म्हणाले की, उत्पन्न वाढत नाही, महागाई वाढत आहे. RBI चा अहवाल येत आहे, ते 8% महागाई दर सांगतील.