ताज्या बातम्या

राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळाली तरीही सभा होणारच, दानवे यांचे वक्तव्य

मुंबई : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेचे आयोजन १ मे रोजी (Maharashtra Din) करण्यात आले असून या सभेला परवानगी म्हणून मनसेची धरपड सुरु आहे.

मात्र परवानगी मागून आठ दिवस झाले असून अजून सभेसाठी परवानगी मिळाली नाही. मनसेकडून मात्र ही सभा होणारच असे सांगण्यात येत असून मनसैनिक सभा घेण्यावर ठाम आहे.

याबाबत मीडियाशी बोलताना मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी मनसेची ही सभा होणारच असे सांगत परवानगी मिळाली नाही तरीही मनसेची १ मे ची सभा होणार असल्याचे दानवे म्हणाले आहेत.

दानवे म्हणाले की, पोलीस (Police) परवानगी नाही दिली तरी राज ठाकरे सभा घेणारच, परवानगी नाही दिली तरी राज ठाकरे सभा घेतल्याशिवाय राहणार नाहीत, असे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केले आहे.

दरम्यान, पोलिसांनी मनसेच्या नियोजित सभा रमजान ईदनंतर (Ramadan Eid) घेतली जावी, असा सल्ला मनसैनिकांना दिला आहे. नियोजित ठिकाणी सभा घ्यायची असेल, तर सभेची तारीख बदलली जावी, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts