संग्राम जगताप नगर विकासाची क्षमता असणारे उमदं नेतृत्व

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- नगर – संग्राम जगताप हे नगर विकासासाठी आपलं कौशल्य वापरुन शहराला पुढे नेतील, असं उमदं नेतृत्व आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे नवे प्रदेश उपाध्यक्ष मुन्ना चमडेवाला यांनी काढले.

श्री.चमडेवाला यांचा सत्कार आ.अरुण जगताप आणि आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते छोटेखानी समारंभात करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देतांना चमडेवाला यांनी दोन्ही आमदारांची दमदार नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचा उल्लेख केला.

आरोग्य व शिक्षण प्रत्येकाला मिळावे, यासाठी अल्पसंख्याक समाजात प्रामुख्याने काम करण्याची संधी या विभागाने पदाच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिली आहे.

ते काम आपण कराला असा विश्‍वास आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केला. आ.अरुण जगताप यांनीही चमडेवाला यांना याप्रसंगी शुभेच्छा दिल्या. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते यांनी प्रास्तविक केले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts