अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणातील खळबळजनक बातमी : अजित पवार यांची भाजप नेत्याने घेतली भेट….खासदारकीची ऑफर?

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अहमदनगरचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी अंबालिका शुगर (ता. कर्जत) येथे आज भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे, सुमारे अर्धा तास चाललेल्या चर्चेचा तपशील अद्याप मिळाला नसला तरी या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.

ही भेट कर्जत -जामखेड चे आमदार रोहित पवार यांच्यासाठी चुलते अजित पवार यांनी काही सोईस्कर मार्ग काढण्यासाठी की आणखी काही? राम शिंदे यांना खासदारकीची ऑफर? यावरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

राम शिंदे ही महाराष्ट्राची माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात. मग त्यांचा काय निरोप घेऊन तर अजित पवारांना भेटले नाहीत ना ? ही भेट म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीची नांदी तर नाही ना ? अशा सर्व चर्चा राजकीय क्षेत्रात चालू आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts