शर्यत लावणे पडले महागात! पोलिसांनी त्यांच्यासोबत केले असे काही….!

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:- शर्यत लावण्यास राज्यात बंदी घालण्यात आली आहे. मात्र तेरी देखील काहीजण शर्यत लावतात. असाच काहीसा प्रकार नगर तालुक्यात घडला आहे. मात्र याबाबत पोलिसांनी शर्यत लावणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडवली आहे.

टांग्याला घोडा जुपुन शर्यत काढणार्‍या तिघांविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्राण्यांना क्रुरपणे वागणूक देणे व इतर कलमासह गुन्हा दाखल केला आहे.

बंडू दंगु बडे, रावसाहेब दंगु बडे (दोघे रा. मेहकरी ता. नगर) व प्रकाश मच्छिंद्र पोटे (रा. बारदरी ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

त्यांच्याकडून ६० हजार रूपये किंमतीचे तीन टांगे पोलिसांनी जप्त केली आहेत. पोलीस नाईक सचिन गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.

कल्याण रोडवरील हिंगणगाव फाट्यावर रविवारी सकाळी साडेनऊ वाजता पोलिसांनी ही कारवाई केली.आरोपी यांनी सकाळी टांग्याला घोडा जुपुन त्यांना चाबुकाने क्रुरपणे मारहाण करून शर्यत काढली.

या प्रकरणाची माहिती एमआयडीसीचे सहाय्यक निरीक्षक युवराज आठरे यांना मिळताच त्यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन आरोपींकडील टांगे जप्त केले. तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार लाळगे करीत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts