Tecno smartphone : धमाकेदार ऑफर! महागड्या फोनवर मिळतेय 23 ​​हजार रुपयांपर्यंत सूट

Tecno smartphone : मागील काही दिवसांपूर्वी Tecno ने आपला नवीन स्मार्टफोन Phantom X2 Pro लाँच केला होता. याची मूळ किंमत 49,999 रुपये इतकी आहे. परंतु, तो तुम्ही कमी किमतीत खरेदी करू शकता. कंपनीने यामध्ये 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज दिले आहे.

जर तुम्हाला हा स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल तर तो तुम्ही Amazon India वरून विकत घेऊ शकता. फोनमध्ये वेगवगेळे भन्नाट फीचर्स दिले आहे. हे लक्षात घ्या की ही ऑफर फक्त काही दिवसांसाठीच असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर तो खरेदी करा.

असे आहेत फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

या फोनमध्ये कंपनी 6.78 इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले देत असून जो 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात 12 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे. प्रोसेसर म्हणून यात डायमेंशन 9000 चिपसेट मिळेल. तर कंपनीकडून यात फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस तीन कॅमेरे दिले आहेत.

यात OIS सह 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 50-मेगापिक्सेलचा पोर्ट्रेट कॅमेरा आणि 13-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्सचा समावेश आहे. तर कंपनी सेल्फीसाठी या फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे. तसेच या फोनमध्ये दिलेली बॅटरी 5160mAh आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. जोपर्यंत OS चा संबंध आहे, हा फोन Android 12 वर आधारित HiOS 12 वर काम करेल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts