Farmer Success Story: ‘या’ शेतकऱ्याचा कष्टाने पिकवलेल्या डाळिंबाने घेतली दुबईला भरारी! 3 एकरमधून मिळवले तब्बल 52 लाखांचे उत्पन्न

Farmer Success Story:- महाराष्ट्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या फळबागांची लागवड शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जात असून यामध्ये पेरू पासून तर डाळिंब, द्राक्ष, सिताफळ, अलीकडच्या काळात नावारूपाला आलेले ड्रॅगन फ्रुट  आणि इतकेच नाही तर सफरचंदाचा प्रयोग देखील महाराष्ट्रातील अनेक भागातील शेतकऱ्यांनी यशस्वी केलेला आहे.

फळबागांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी आता कमीत कमी क्षेत्रांमध्ये भरघोस उत्पादन मिळवण्याची किमया साध्य करून काही लाखांमध्ये उत्पन्न मिळवले आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीला शेतकऱ्यांचा कष्ट आणि व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून नेमकेपणाने केलेले काम या गोष्टींचा खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना झालेला आहे.

अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण निमगाव टेंभुर्णी येथील रहिवासी असलेले बंडू हरिदास शिंदे या शेतकऱ्याची यशोगाथा बघितली तर ती इतर शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणादायी अशी आहे. या शेतकऱ्याने दर्जेदार असे डाळिंबाचे उत्पन्न घेऊन ते थेट दुबईच्या मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवले व त्या माध्यमातून 52 लाखांचे उत्पन्न मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत.

 तीन एकर मधून घेतले 52 लाखांचे उत्पन्न

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोलापूर जिल्ह्यात असलेल्या निमगाव टेंभुर्णी येथील रहिवासी असलेले बंडू हरिदास शिंदे यांनी मागील काही वर्षांपूर्वी शिराळ(मा) या ठिकाणी माळरान जमिनीची खरेदी केली होती.

या जमिनीमध्ये त्यांनी मोठ्या कष्टाने पाण्याची सोय केली व संपूर्ण क्षेत्र बागायती केले. जेव्हा क्षेत्र बागायती झाले तेव्हा त्यांनी डाळिंब लागवड करण्याचे ठरवले व तीन एकर क्षेत्रामध्ये डाळिंबाची लागवड केली व योग्य असे व्यवस्थापन ठेवून दर्जेदार उत्पादन मिळवले आहे.

 अशा पद्धतीने केले डाळिंब पिकाचे व्यवस्थापन

डाळिंब लागवड केल्यानंतर त्यांनी व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून नियोजनबद्ध प्लॅनिंग केली. डाळिंबासाठी त्यांनी एका एकरला चार ट्रॉली शेणखत व सुरुवातीस प्रति झाड एक किलो व झाडाला आराम दिल्यानंतर दर दीड महिन्याला एक किलो रासायनिक भेसळखत व यामध्येच जैविक खतांचा वापर केला.

झाडांना वाळवी किंवा हुमणी तसेच किडी व गोगलगाईचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून भूअत्र प्रति एकर 6 किलो वापरले. व्यवस्थित नियोजनाने जमिनीची सुपीकता वाढून गांडूळ यांची संख्या वाढण्यास देखील मदत झाली. सगळ्यात महत्वाचे म्हणजे बागेवर मर आणि तेल्या रोग येऊ नये यासाठी त्यांनी विशेष प्रकारचे खबरदारी घेतली व दर्जेदार असे डाळिंब पिकाचे उत्पादन मिळवले.

 एका झाडाला मिळाले 20 किलो डाळिंब

योग्य व्यवस्थापन ठेवल्यामुळे एका डाळिंबाचे वजन दोनशे ते चारशे ग्रॅम पर्यंत त्यांना मिळाले. विशेष म्हणजे व्यापाऱ्यांनी हे सर्व डाळिंब त्यांच्या शेताच्या बांधावर येऊन खरेदी केले व कुठलाही खर्च न लागता त्यांना प्रति किलोला 180 रुपये इतका उच्चांकी दर मिळाला व हा डाळिंब दुबईला निर्यात करण्यात आलेला आहे.

लहानपणी त्यांनी तीन एकरातून 30 टन डाळिंबाची निर्यात केली असून सरासरी एका एकरमध्ये अडीच लाख रुपये खर्च झाला व तीन एकर करिता साडेसात लाख रुपये खर्च झाला. त्यांनी पिकवलेल्या डाळिंबाला जवळपास 180 रुपये प्रति किलोचा दर मिळाला व एकूण त्यांच्या हाती 52 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

अशाप्रकारे कष्ट आणि योग्य व्यवस्थापन ठेवले तर कुठल्याही पिकापासून शेतकरी चांगले उत्पादन मिळवून लाखोत उत्पन्न मिळवू शकतात हे आपल्याला बंडू हरिदास शिंदे यांच्या उदाहरणावरून दिसून येते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts