अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 :- देशात कृषी विभाग (Department of Agriculture) आणि महसूल विभाग दोन महत्त्वाचे व जन कल्याणासाठी सुरु करण्यात आलेले प्रशासन विभाग आहेत.
राज्यात ही महसूल विभाग राज्यातील महसुलावर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्य करीत असते. शेतकऱ्यांचा नेहमीच महसूल विभागाशी संबंध येत असतो. आता शेतकरी बांधवांची (Farmers) महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडूनच लूट केली जात असल्याचा आरोप केल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
महसूल विभागाच्या (Department of Revenue) अधिकाऱ्यानी बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana) संग्रामपूर तालुक्याच्या (Sangrampur) शेतकऱ्याची जमीन हडपून परस्पर विक्री केल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून लावला गेल्याने मोठा गदारोळ बघायला मिळत आहे.
महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी मौजे चिचारी येथील आदिवासींच्या शेतजमिनी हडपून परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आता या संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनी परत करण्यात याव्या म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना रणांगणात उतरली असून यासाठी मोठी आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे.
विदर्भात आदिवासीच्या जमिनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी परस्पर विक्री केल्याचा आरोप झाला असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर संबंधित आदिवासी शेतकऱ्यांसमवेत सोमवारपासून आमरण उपोषणास बसले आहेत.
शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Collector’s Office) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या पदाधिकाऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अशिक्षित आदिवासी शेतकऱ्यांचा अडाणीपणाचा फायदा घेत महसूल अधिकारी परस्परच कागदपत्रांवर खाडाखोड करत शेत जमिनीची विल्हेवाट करत आहेत.
यामुळे संपूर्ण राज्यात मोठा गदारोळ निर्माण झाला असून आता प्रशासनच शेतकऱ्यांचा जीव घेत असेल तर शेतकऱ्यांचे काय होणार? असा मार्मिक सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
अजूनही आदिवासी शेतकरी अशिक्षित आहेत. या शेतकऱ्यांना जमिनीच्या व्यवहारासंबंधी कागदपत्रांची माहिती देखील नाही. याच अडाणीपणाचा फायदा घेत महसूल विभागातील अधिकारी कागदपत्रांवर खाडाखोड करत परस्पर जमिनीचा व्यवहार करीत आहेत.
यामुळे गरीब आदिवासी शेतकऱ्यांवर भूकमारी ओढवण्याची वेळ आली आहे. आता या प्रकरणावर कोणती कडक कारवाई केली जाते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
सुरूवातीला संबंधित आदिवासी शेतकऱ्यांना आपल्या जमिनी परस्पर कोणीतरी विक्री केल्या आहेत याबाबत कुठलीच माहिती नव्हती. पण ज्यावेळी आदिवासी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी कसण्यासाठी सुरुवात केली त्यावेळी आपल्या जमिनी कोणीतरी हडप केल्याचा प्रकार या आदिवासी बांधवांच्या लक्षात आला.
जमिनी विक्री झाल्याचे समजतात आदिवासी शेतकरी बांधवांच्या पायाखालची जमीनच सरकली, यामुळे संग्रामपूर तालुक्यातील मौजे चिचारी येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.
महसूल मधील अधिकाऱ्यांनीच कागदपत्रांची बनवाबनवी करत परस्पर आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी विकल्या असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात येताच संबंधित शेतकरी महसूल विभागाविरुद्ध आक्रमक झाले असून आमरण उपोषणाचा पवित्रा अंगीकारला आहे.
संबंधित शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी परत केल्या जाव्या यासंदर्भात आमरण उपोषणास सुरुवात केली असून जमिनी लवकरात लवकर दिल्या जाव्यात अशा मागण्या केल्या आहेत.