अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खतांची कमतरता भासू नये, म्हणून शेतकऱ्यांनी खत विक्रीसाठी कृषी केंद्रांवर गर्दी केली आहे.
यामुळे कोरोनात नियमांचे उल्लंघन होत असून फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे.तालुक्यात बाधित संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने प्रशासनाने खत विक्रीचे नियोजन करून गर्दी आटोक्यात आणावी,
अन्यथा पुन्हा कोरोना उपाय योजनांचे नियोजन कोलमडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरीप हंगामासाठी लागणाऱ्या खतांची तालुक्यात अनेकदा कमतरता भासली.
पाणी असूनही खताअभावी शेतकऱ्यांची नुकसान झाली पिकांना वेळीच खते देण्यासाठी अडचणी निर्माण होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रात गर्दी केली.
सकाळपासूनच खत मिळण्यासाठी दुकानांबाहेर रांगा लागत आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे.