Government scheme : 2014 मध्ये काँग्रेसला सत्ता बाहेर करून सत्तेवर आलेल्या बीजेपी सरकारने 2019 मध्ये शेतकरी हिताची एक महत्त्वाकांक्षी योजना (Farmers Scheme) संपूर्ण देशात कार्यान्वित केली.
मोदी सरकारने (Modi Government) पीएम किसान सम्मान निधि योजना (Pm Kisan Yojana) नामक एक शेतकरी हिताची योजना सुरु केले ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये थेट आर्थिक मदत म्हणून दिले जातात.
खरं तर अशी थेट आर्थिक मदत देणारी ही भारतातील पहिलीच शेतकरी हिताची योजना आहे असा दावा केंद्र सरकार (Central Government Scheme) करत असते. या योजनेच्या (Sarkari Yojana) माध्यमातून आतापर्यंत जवळपास सर्व पात्र शेतकऱ्यांना दहा हप्ते देण्यात आले आहेत.
म्हणजेच एका पात्र शेतकऱ्याला वीस हजार रुपये या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत मिळाले आहेत. आता नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आहे.
खरंतर सरकार लवकरच या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपयांचा 11 वा हप्ता पाठवणार आहे. त्याचवेळी, काही दिवसांपूर्वी सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य केली होती.
त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्यावे. तसे, शेतकऱ्यांनी ई-केवायसी ऑफलाइन केल्यास, त्यासाठी त्यांना काही पैसे देखील मोजावे लागणार आहेत. मात्र असे असले तरी शेतकरी बांधव स्वतःही ई-केवायसी करू शकता. आज आपण ऑफलाइन पद्धतीने तसेच ऑनलाइन पद्धतीने ई-केवायसी प्रक्रियेबद्दल जाणून घेणार आहोत.
31 मे पूर्वी ई-केवायसी करणे बंधनकारक
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सरकारने ई-केवायसी प्रक्रियेची अंतिम तारीख वाढवली आहे. पीएम किसान पोर्टलवरील अद्ययावत माहितीनुसार, शेतकरी 31 मे 2022 पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया करू शकतात.
मित्रांनो यापूर्वी ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 होती. आता यामध्ये मदतवाढ करण्यात आली आहे तरीही केवळ 50 टक्के शेतकऱ्यांनीच ही प्रक्रिया पूर्ण केली आहे.
कशी करणार केवायसी
पीएम किसान पोर्टलवर ऑनलाइन केवायसी (ई-केवायसी) करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. आधार आधारित ओटीपी प्रमाणीकरणासाठी तुम्ही पोर्टलवरील किसान कॉर्नरमधील ई-केवायसी पर्यायावर जाऊ शकता.
दुसरीकडे, बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी, तुम्हाला तुमच्या जवळच्या CSC केंद्राला भेट द्यावी लागेल. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, तुम्ही घरबसल्या ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करू शकता.
E-KYC ची प्रक्रिया जाणून घ्या:
ई-केवायसी करण्यासाठी, प्रथम तुम्हाला https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जावे लागेल.
आता होम पेजच्या उजव्या बाजूला पर्याय दिसतील. येथे तुम्हाला e-KYC लिहिलेले दिसेल, त्यावर क्लिक करा.
आता तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा.
याशिवाय बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या CSC केंद्राला भेट द्यावी लागेल.