Business Idea : प्रत्येक स्वयंपाक घरात तुम्ही जिरी पाहिलीच असेल. जिरीला प्राचीन काळापासून वेगळे स्थान आहे. केवळ स्वयंपाकातच नाही तर तिचा अनेक आजारांवर घरगुती उपाय म्हणून वापर करतात. कॉलरा, कफ, पेटके,अपचन तसेच घसा खवखवणे यांसारख्या अनेक आजारांवर जरीचा वापर करण्यात येतो.
जिरी हे एक नगदी पीक आहे. जर तुम्ही जिरीची लागवड केली तर महिन्याभरातच लाखो रुपये कमावू शकता. कारण जिरीला मार्केटमध्ये खूप मागणी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय जिरीची शेती करू शकता.
यापूर्वी जिरीची लागवड अमेरिका, इजिप्त, इराण आणि अफगाणिस्तानात केली जायची. परंतु आता ती भारतातही केली जात आहे. भारतात महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, तामिळनाडू, बिहार, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश ही जिरीची लागवड करणारी प्रमुख राज्ये आहेत. तर राजस्थानमधील चित्तोडगड आणि झालवाडा या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जिरीची लागवड करण्यात येते. त्यासोबतच भिलवाडा, कोटा, बुंदी आणि बांसवाडा या जिल्ह्यातही जिरीची लागवड केली जाते.
अशाप्रकारे करा शेती
जिरी ही भाजी किंवा कोशिंबीर बनवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. ही वनस्पती लागवड करण्यासाठी, चांगला निचरा असणारी सुपीक जमीन उपयुक्त असून लागवडीसाठी, जमिनीचे pH मूल्य 6.5 ते 8 दरम्यान असावे लागते. जिरीची लागवड रब्बी हंगामात अर्थातच हिवाळ्यात करण्यात येते.
या पिकासाठी जास्त उष्णता चांगली नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पिकासाठी कमी पाणी लागत असल्याने रब्बी हंगामात त्याची लागवड केली जाते. भारतात पेरणीसाठी योग्य वेळ ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान आहे. लागवड 30 अंश पर्यंत तापमान आवश्यक आहे.
किती होते कमाई
जातींनुसार सरासरी 10 क्विंटल प्रति एकर उत्पादन मिळते. जरीचा बाजारभाव 12,000 ते 20,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचतो. त्यामुळे तुम्ही एक एकर जागेत 2.25 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न घेऊ शकता.