अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- शेती मशागतीची कामे करून खरीपाच्या पेरणीसाठी बी-बियाणे, रासायनिक खतांची शेतकऱ्यांनी खरेदी केली आहे.
मात्र मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत. पाऊसच नसल्याने सर्व कामे थांबली आहेत.
तालुक्यात ४२.२ टक्के पाऊस झाल्याचा अंदाज प्रशासनाने जाहीर केला आहे. नेवासे तालुक्यात सन २०२१ च्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी महागाईच्या काळात खरीपाच्या पेरणीसाठी शेतीच्या मशागतीची कामे केली.
इंधन दरवाढीचा विचार न करता. तसेच तालुक्यात बि-बियाणे , रासायनिक खते खरेदी करण्यासाठी मोठा संघर्ष केला.
तालुक्यात रासायनिक खतांची टंचाई कमी करण्यात कृषी विभाग अपयशी ठरल्याचे याचा फटका शेतकऱ्यांना बसला. या सर्व परिस्थिती वर मात करत हंगाम तयारी केली.
मात्र हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पाऊस होत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. यामुळे शेतकरी वर्गावर पुन्हा नैसर्गिक संकट घोंघावत आहे.