ताज्या बातम्या

शेतकऱ्याची कमाल! ‘या’ शेतकऱ्याने पिकवले पिवळ्या कलरचे कलिंगड; कलिंगडास आहे अननसची चव; 32 रुपये किलोचा मिळतो दर

Farmer succes story:देशातील शेतकरी बांधव शेती व्यवसायात (Farming) कायम बदल करत असतात. यात प्रामुख्याने पीकपद्धतीत बदल केला जातो. शिवाय शेतकरी बांधव (Farmers) पिकांच्या जाती देखील कायम बदलत असतात. शेतकरी बांधव पिकांच्या सुधारित जातींची (Improved Varieties) पेरणी करतात जेणेकरून त्यांना शेतीतून चांगले उत्पन्न (Farmers Income) मिळवता येईल.

मध्यप्रदेश मधील (Madhya Pradesh) एका शेतकऱ्याने देखील कलिंगडच्या एका सुधारित जातीची (Watermelon Improved Variety) पेरणी केली असून यातून त्यांनी चांगले उत्पन्न देखील मिळवले आहे.

विशेष म्हणजे या शेतकऱ्याने उत्पादित केलेले कलिंगड (Watermelon Production) हे आतून पिवळ्या रंगाचे (Yellow Watermelon) असून त्याला अननस सारखी चव आहे. या कलिंगडचे हे गुणधर्म पाहता या शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या कलिंगडास मोठी मागणी आहे आणि पंचक्रोशीत पिवळ्या कलरचे आणि अननसची चव असलेले हे कलिंगड सध्या चांगल्याच चर्चेत आले आहे. या कलिंगडाला मध्यप्रदेशच्या इंदोर तसेच राजधानी दिल्लीत मोठी मागणी असल्याचे सांगितले जात आहे.

मित्रांनो मध्य प्रदेश राज्याच्या धार जिल्ह्यातील बदनावारच्या मौजे ढोलना गावात राहणारे ललित आणि मुकेश रामेरिया या शेतकर्‍यांनी हे खास टरबूज पिकवण्याची किमया साधली आहे. सध्या सुरु असलेल्या उन्हाळ्यात लोक या पिवळ्या रंगाच्या टरबूजांचा भरपूर आस्वाद घेत असल्याचे बघायला मिळत आहे. असे सांगितले जाते की, हे पिवळे टरबूज लाल टरबूजापेक्षाही अधिक स्वादिष्ट आहे. यामुळेच कि काय हे टरबूज पाहण्यासाठी आणि खाण्यासाठी आजूबाजूचे लोक थेट या नवयुवकांच्या शेतात पोहोचत आहेत.

32 रुपये किलोपर्यंत मिळाला भाव
एकाच शेतात वेगवेगळ्या जातीच्या टरबूजांची लागवड केल्याचे शेतकरी ललित आणि मुकेश यांनी सांगितले. काही वाण उष्णतेने आणि विषाणूंमुळे खराब झाले. मात्र आतमध्ये पिवळा रंग असलेली ही नवीन जात चांगली असल्याचे या दोन शेतकऱ्यांनी सांगितले.

या नवयुवक शेतकऱ्यांच्या मते, हा पहिला प्रयत्न चांगला होता कारण याची चव नवीन होती. यातून या शेतकऱ्यांना माळव्यातील सुपीक जमिनीत पहिल्यांदाच चांगले उत्पादन मिळाले आहे. बडनावार, इंदूरसह राज्यातील इतर शहरांबरोबरच हे टरबूज दिल्लीलाही पाठवण्यात आले आहे. तेथे हे टरबूज 32 रुपये किलोने विकले जात होते.

तैवानहून 70 हजार रुपये किलो प्रमाणे मागवले बियाणे
मित्रांनो खरे पाहता, मुकेश यांनी हे टरबूज यूट्यूबवर बघितले होते. यूट्यूब व्हिडिओवरती हे विशिष्ट प्रकारचे टरबूज बघितल्यानंतर मुकेश यांनी आपल्या शेतात याचे उत्पादन घेण्याचे आणि शेती मध्ये जरा हटके करण्याचे ठरवले. मग काय या अवलिया शेतकऱ्याने हे तैवानचे बियाणे मागवण्याचा निर्णय घेतला.

ज्यासाठी त्याला 70 हजार रुपये प्रति किलो दराने पैसे मोजावे लागले. एक बिघा जमिनीत 250 ग्रॅम बियाणे पेरले. यासाठी सिंचन आणि खताची गरज असते. असे असले तरी बरेच लोक सुरुवातीला हे कलिंगड खाण्यास संकोच करत होते मात्र आता एकदा खाल्ल्यानंतर त्याची चव ते कधीही विसरू शकत नाहीत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts