PM Kisan Yojana: सरकार (government) शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध योजना राबवत असते. या योजनांमागे लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातात. पंतप्रधान किसान सन्मान निधी (Prime Minister Kisan Samman Fund) ही देखील अशीच योजना आहे.
आतापर्यंत 11 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे (money to farmers’ bank accounts) पाठवण्यात आले आहेत. शेतकरी आता बाराव्या हप्त्याची वाट पाहत आहे. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी (e-KYC) करणे आवश्यक आहे.
जर तुम्ही अद्याप ई-केवायसी केले नसेल, तर तुमचे 12 व्या हप्त्याचे पैसे अडकू शकतात. सरकारने आता त्याची तारीख 31 ऑगस्ट 2022 पर्यंत वाढवली आहे. अशा परिस्थितीत, या तारखेपूर्वी, तुम्हाला ई-केवायसी करणे आवश्यक आहे.
अशा प्रकारे ई-केवायसी करता येते –
– सर्वप्रथम पीएम किसान https://pmkisan.gov.in/ च्या अधिकृत पोर्टलवर जा.
– वेबसाइटवर गेल्यानंतर उजव्या बाजूला ‘ई-केवायसी’चा पर्याय दिसेल.
– त्यावर क्लिक करा.
– यानंतर तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक (Aadhaar Number) टाकावा लागेल.
– आधार क्रमांक भरल्यानंतर कॅप्चा कोड भरा आणि सर्च वर क्लिक करा.
– त्यानंतर तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक येथे भरावा लागेल, ज्यावर एक OTP येईल.
– हा OTP इथे एंटर करा आणि असे केल्याने तुमचे e-KYC यशस्वीरित्या पूर्ण होईल.
पीएम किसानशी संबंधित समस्यांसाठी येथे संपर्क साधा –
पीएम किसान योजनेंतर्गत नोंदणी करण्यापासून ते हप्ते मिळवण्यापर्यंत अनेक वेळा शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. तुम्हालाही या योजनेबाबत कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत असतील तर तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 011-24300606 या हेल्पलाइन क्रमांकावर (Helpline number) कॉल करू शकता.
याशिवाय 18001155266 या टोल फ्री क्रमांकावर शेतकऱ्यांशी संपर्क साधता येईल. त्याच वेळी, शेतकरी pmkisan-ict@gov.in वर मेल करून त्यांच्या समस्येचे निराकरण देखील मिळवू शकतात.