सलग 4 दिवसांपासून ‘या’ ठिकाणचे शेतकरी काळोख्या अंधारात

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- एकीकडे वीजबिल सक्तीसाठी महावितरण आक्रमक भूमिका घेताना दिसते. मात्र विजेचा पुरवठा खंडित झाला असता तो दुरुस्तीसाठी लक्ष देखील देत नसल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी दिसत आहे.

महावितरणाचा एकही अधिकारी व कर्मचारी साधा फोन रिसीव्ह करण्याची तसदीसुद्धा घेईना. यामुळे येथील शेतकर्‍यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे नागरिकांना अंधारात जगणायची वेळ ओढवली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, नुकतेच कोल्हार भगवतीपूर येथे तिसगाव फिडर अंतर्गत असणार्‍या शेतकर्‍यांना गेल्या 4 दिवसांपासून वीज मिळेना. सलग 4 दिवसांपासून येथील शेतकरी अंधारात आहेत.

कोल्हार भगवतीपूर येथे शनिवारी सकाळी 7 वाजता खंडित झालेला वीज पुरवठा मंगळवारी संध्याकाळपर्यंत सुरळीत झाला नाही हे दुर्दैव.

4 दिवस अंधारात आणि पाण्याविना शेतकर्‍यांना जगावे लागत आहे. गेल्या चार दिवसापासून शेतकर्‍यांना पिण्यासाठी पाणी मिळेना की अंगणाच्या गोठ्यात बांधलेल्या पशुधनाला पाणी मिळेना.

तहानलेली जनावरे व्याकूळ झाली आहे. विजेअभावी शेतकरी हतबल झाला असून उभ्या पिकांना पाणी देणे शक्य होत नाही आहे. वीज पुरवठा कधी सुरळीत होणार हे माहित नाही.

कारण वीज वितरण कार्यालयात फोन केला असता, कोणी उचलत नाही. मोबईल रिसीव्ह करायला अधिकारी आणि कर्मचार्‍यांना वेळ नाही. जरी बोलणे झालेच तर उडवाउडवीची उत्तरे ठरलेली.

हा प्रश्‍न तातडीने सुटला नाही तर शेतकरी लवकरच नुकसान भरपाईसाठी वीज नियामक आयोगाचा दरवाजा ठोठावण्याच्या तयारीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts