अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- श्रीगोंदा तालुका विजेच्या बाबतीत लवकरच स्वयं पूर्ण होऊ शकतो मात्र शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार बबनराव पाचपुते यांनी केले .
याबाबत प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात आमदार पाचपुते यांनी सांगीतले कि भाजप सरकार असताना तालुक्यात ३५०मेगावेट सौर वीज निर्मितीच्या प्रकल्पाचे प्रस्ताव सादर केले होते
पण मध्यन्तरी सरकार बदलल्यामुळे काही अडचणी निर्माण झाल्या आहेत तरी पण तालुक्यातील देवदैठण येते ७.९९ मेगावॅट व पिंप्री कोलंदर २.९ मेगावॅट चे सौर वीजनिर्मिती प्रकल्प सुमारे ६६कोटी रुपये खर्च करून कार्यन्वित झाले आहेत
पण इतर ४५ गावातील सुमारे ३३९मेगावॅट चे प्रस्थाव अद्यापही प्रलंबित असून या प्रकल्पावर १८२५कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे ,तालुक्यातील ज्या गावातील शासकीय जमिनी वरील प्रस्थाव सादर केले आहेत
अद्याप निर्णय झाला नाही म्हणून लवकरच जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक आयोजित करण्यात येणार आहे असे पाचपुते यांनी सांगीतले . तसेच तालुका विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी शेतकऱ्यांनीही सहभागी होणे गरजेचे आहे
त्यामुळे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आहे या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना नापिक व पडीक जमिनीतून मोबदला मिळणार आहे या सौर प्रकल्पास कमीत कमी १० एकर जमीन आवश्यक आहे
या जमिनीचे व वीज उपकेंद्राचे अंतर ५ किलोमीटर पर्यंत असणे गरजेचे आहे अश्या नापीक व पडीक जमिनी महावितरण भाडेतत्वावर करार पद्धतीने घेणार आहेत
यासाठी शेतकऱ्यांना एका एकरासाठी ३० हजार रुपये प्रतिवर्षी भाडे व प्रति वर्षी ३ टक्के भाडेवाढ मिळणार आहे तरी शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन आमदार बबनराव पाचपुते यांनी केले आहे .
या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी महावितरण च्या www.mahadiscom.in/solar-mskvy या वेबसाईट व अर्ज दाखल करावेत असे आवाहन पाचपुते यांनी केले आहे