ताज्या बातम्या

Farming Business Idea: ‘या’ पिकाची लागवड करा आणि कमवा बक्कळ पैसा; वाचा याविषयी सविस्तर

Farming Business Idea: मित्रांनो भारतात मोठ्या प्रमाणात भाजीपालावर्गीय पिकांची शेती केली जाते. याशिवाय शेतकरी बांधव कमी दिवसात काढणीसाठी येणाऱ्या पिकांची देखील मोठ्या प्रमाणात शेती करत असतात.

विशेष म्हणजे कमी कालावधीत काढणीसाठी येणाऱ्या पिकांची शेती शेतकऱ्यांसाठी (Farmers) मोठी फायदेशीर सिद्ध होतं आहे. आज आपण आपल्या वाचक मित्रांसाठी अशाच एका अल्प कालावधीत आणि कमी खर्चात उत्पादन देणाऱ्या पिकाच्या शेतीविषयी सविस्तर जाणुन घेणार आहोत.

मित्रांनो आज आपण काकडीच्या शेतीविषयी (Cucumber Farming) महत्वपूर्ण माहिती जाणुन घेण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग वेळ न दवडता जाणुन घेवूया याविषयी.

काकडी लागवडीसाठी शेतजमीन
मित्रांनो काकडीच्या शेतीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे यासाठी खर्च खूपच कमी आहे. मात्र यातून खूप कमी वेळेत चांगली मोठी कमाई केली जाऊ शकते. मित्रांनो आम्‍ही तुम्‍हाला सांगू इच्छितो की काकडीची लागवड वालुकामय चिकणमाती असलेल्या शेतजमिनीत आणि भारी कसदार जमिनीत केली जाऊ शकते.

मात्र पाण्याचा चांगला निचरा होणार्‍या वालुकामय आणि चिकणमाती असलेल्या जमिनीत याची लागवड सर्वात फायदेशीर असल्याचा दावा केला जातो. विशेष म्हणजे याच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना सरकारी मदतही मिळू शकते.

कृषी तग्याच्या मते, काकडीच्या लागवडीसाठी जमिनीचे pH मूल्य 6-7 च्या दरम्यान असावे. उच्च तापमानात त्याची लागवड चांगली होते. उन्हाळ्यामुळे सध्या काकड्यांना चांगली मागणी आहे. खरं पाहता काकडीला बारामाही चांगली मागणी असते.

यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळत असल्याने याची मागणी अधिक असते यामुळे काकडीची शेती शेतकऱ्यांना निश्चितच फायदेशीर ठरणार आहे आणि त्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे.

काकडीचे पीक 60 ते 80 दिवसांत काढणीसाठी तयार होते. म्हणजेच केवळ दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीत या पिकापासून उत्पन्न मिळायला सुरवात होते. मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, काकडीच्या लागवडीसाठी जमिनीचा pH 5.5 ते 6.8 असणे चांगले मानले जाते. या पिकांची लागवड नद्या आणि तलावांच्या काठावर देखील केली जाऊ शकते.

कमाई किती होणार
काकडी हे कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे पीक मानले जाते. काकडीचे सरासरी 70 क्विंटल पीक काढण्यास एकरी 50 हजार रुपये खर्च येतो. मंडईत त्याची किंमत 1000 ते 2000 रुपये प्रति क्विंटल आहे.

सरासरी 1500 रुपये प्रति क्विंटल भाव असला तरी एकरी 1 लाखाच्या वर पीक विकले जाते. एकरी 50 हजार रुपयांचे उत्पन्न सहज मिळवता येऊ शकते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts