अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Krushi news :- मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे भारतात एकूण तीन हंगामात शेती केली जाते. खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगाम.
उन्हाळी हंगामातील पिके आता जवळपास हार्वेस्टिंग (Crop Harvesting) होण्याच्या मार्गावर असून काही शेतकऱ्यांचे उन्हाळी हंगामातील पीक हार्वेस्टिंग देखील झाले आहे.
उन्हाळी हंगामातील पिकांची काढणी झाल्यानंतर शेतकरी बांधव खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी पूर्वमशागत (Pre-Cultivation) करत असतो.
सध्या संपूर्ण देशात शेतकरी बांधव (Farmer) पूर्व मशागतीसाठी लगबग करताना बघायला मिळत आहेत. खरीप पिकांच्या पेरण्या आता अगदी जवळ आल्या आहेत.
शेतकरी पूर्व मशागतीची कार्य तर करतच आहे शिवाय खरीप हंगामासाठी आवश्यक खतांचा तसेच बी-बियाणांचा साठा देखील करीत आहे.
असे असले तरी आता बदलत्या काळानुसार अनेक शेतकरी पारंपरिक शेती सोडून इतर पर्यायांकडे वळत आहेत. अशा परिस्थितीत अनेक शेतकरी ग्लॅडिओलससारख्या आकर्षक फुलांची लागवड करून चांगला नफा कमावत आहेत.
यामुळे आज आपण या फुलाच्या शेती (Gladiolus Flower Farming) विषयी जाणून घेणार आहोत. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ग्लॅडिओलस या फुलांचा वापर कट फ्लॉवर, बेड, बॉर्डर, गार्डन आणि कुंड्यांचे सौंदर्य वाढविण्यासाठी केला जातो.
या फुलासाठी उबदार हवामान सर्वोत्तम मानले जाते. सुमारे 16 ते 40 अंश सेंटीग्रेड तापमान त्याच्या लागवडीसाठी चांगले मानले जाते.
या फुलाचे नाव बहुतांश शेतकऱ्यांना माहीत नाही. अशा स्थितीत यातून चांगला नफा कमावता येईल की नाही अशी शंका त्याच्या मनात असते.
पण मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आंतरराष्ट्रीय बाजारासह अनेक मोठ्या हॉटेल्समध्ये सजावटीसाठी ही फुले आणली जातात.
त्याच्या किमतीही बाजारात बऱ्यापैकी आहेत. अशा परिस्थितीत या फुलाची लागवड करणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.
या फुलांची काढणी केव्हा होईल अर्थात उत्पादन कधी मिळेल हे सर्व त्याच्या जातींवर अवलंबून असते. आगात लावल्या जाणाऱ्या ग्लॅडिओलस फुलांच्या जातींतुन सुमारे 60-65 दिवसात सहजरीत्या उत्पादन मिळवले जाऊ शकते, सर्वसाधारण जातींमध्ये सुमारे 80-85 दिवसात उत्पादन मिळते आणि उशीरा येणाऱ्या वाणांमधून सुमारे 100-110 दिवसांनी फुले येतात.
कृषी तज्ञांच्या मते, ग्लॅडिओलस फुलांच्या लागवडीत शेतकऱ्यांनी हात आजमावून बघावा. या फुलांच्या लागवडीचा खर्च कमी नाही पण अल्पावधीतच शेतकरी लाखोंचा नफा कमावतो यामुळे या फुलाची शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते.